पूर्वाश्रमीचे नाव : श्री.मनोहर चुनीलाल खैरनार.
जन्म दिनांक : ०३ जुलै १९४६
जन्म स्थळ : बेटावद ता.शिंदखेडा जि.धुळे
स्वामीजी हे मां शक्ती ( दुर्गा देवी ) चे उपासक आहे. मां शक्ती त्यांना साम्यर्थ देते. देवीने बऱ्याचदा दृष्टांत दिला आहे. त्यांची हि अखंड साधना गेली अनेक वर्ष नित्य नियमाने चालत आहे.
स्वामीजी च्या प्रवासाची सुरवात साधारणत १९५९ मध्ये झाली तेव्हा वय साधारण १२-१३ असेल. शाळेत अगदी हुशार विद्यार्थी म्हणून ओळख होती. गावात तसे वातावरण काही वेगळे नव्हते न कधी साधू संन्यासी राहत होते पण त्याच वेळेस तोंडातून एक वाक्य बाहेर पडले " मी मागच्या जन्माचा संन्यासी आहे आणि या जन्मातपण संन्यास घेणार आहे" हि खरी सुरवात झाली . खरे तर त्या वेळीस संन्यास म्हणजे काय आणि संन्यासी म्हणजे काय हे काही माहित नव्हते आणि अर्थातच हे शब्द ऐकून घरच्यांना गम्मत वाटली आणि सगळे हसले. त्या वेळीस फक्त शांत होते ते वडील. स्वामीजीमध्ये एक विशेष गुण अंगीभूत होता तो म्हणजे न कधी जेवणाचे लाड न कधी कपड्याचे ह्या करता आई रागवायची कि कधी तुला कपड्यांची काळजी न खाण्यात ( जेवणात खारट , आंबट , गोड, मीठ जास्त असो कि कमी तरी कसली फिर्याद नाही ) मग कधी त्यांच्या आई बोलयाच्या कि तू मागच्या जन्माचा योगी होतास पण योगी म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हते .
नववीत असताना स्वामी विवेकानंद बद्दल अल्प अशी माहिती असताना त्याच वेळीस शाळेतील सरांनी स्वामी विवेकानंद चे चरित्र पुस्तक हातात देत म्हटले कि दोन दिवसांत वाचून काढ परवा जयंती आहे. शाळेत एकटे बसले असताना अचानक डोळ्यासमोर दिव्य प्रकाश, समोर स्वामी विवेकानंद उभे. तो भ्रम नव्हता न स्वप्न ना भास . त्याच वेळीस आवाज आला "देश आणि धर्माच्या सेवेसाठी तुला संन्यास घ्यायचा आहे" . पुन्हा हीच घटना स्वामीजी बी एस्सी ला असताना घडली. तेच दर्शन , तेच वाक्य , मनात काही कल्पना नसताना. काही दिवस असेच निघाले एम एस्सी झाले आणि मग नौकरी करू लागले. त्याच काळात अहमदनगरला कॉलेज मध्ये नौकरी करत असताना रात्री अचानक सप्तशृंगी देवीचे दर्शन झाले व व कधीही न बघितलेल्या मुलीकडे बोट दाखवत आज्ञा झाली " हिच्याशी तुला लग्न करायचे " स्वप्न ज्या सकाळी पडले त्याच दिवशी सकाळी पत्र मिळाले आणि मुलगी बघायला स्वामीजी गेले आणि काय आश्चर्य ज्या मां भगवतीने स्वप्नात मुलगी दाखवली तीच मुलगी समोर. हि घटना १९७२ ची त्याच वेळीस स्वामीजीनी सांगितले कि मी पूर्वजन्मीचा संन्यासी आहे मी पुन्हा कधी संन्यास घेईल तरी विचार करावा उत्तर मिळाले मी अडवणार नाही . फक्त तुमच्या हाताने मंगळसूत्र गळ्यात घालेल आणि सिंदूर भरेल, हि घटना अगदी आश्चर्यकारक होती . नगर सोडले पुण्याला आले , लग्न झाले मुलगा झाला. सप्टेबर मध्ये मुलगा २ वर्षाचा झाला त्याच वेळीस जेवत असताना अचानक अंगावर वीज पडावी तसे स्वामी दचकले आणि सगळ्यांचा एक प्रश्न काय झाले तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिले मां भगवतीचा आदेश आला आहे एक वर्षाच्या आत घर सोडायचे. मग काय तो सोनियाचा दिन आला आषाढ महिना ( जुलै ).तेव्हा रात्री स्वप्न पडले त्या स्वप्नात एक अत्यंत तेजस्वी दिव्य पुरुषाचे दर्शन झाले त्यात स्वामीजींच्या डोक्यावर हात ठेवून त्या दिव्य पुरुषाने विचारले "अजून किती दिवस घरात राहायचे आहे ? चल मी तुला घ्यायला आलो आहे " नंतर ते वर्णन स्वामीजींच्या वडिलांनी ऐकले व सांगितले कि दुसरे कोणी नसून "ते माझे गुरु महायोगी वल्लीनाथ महाराज आहे. त्यांची आज्ञा झाली तर तू जा " हे शब्द ऐकून आईला खूप रडू आले खूप समजवले पण वडील शांत होते. स्वामीजी त्या वेळीस किर्लोस्कर कंपनी मध्ये कामास होते. तीन महिने निघून गेले घरातील वातावरण शांत होते.
अश्विन महिना , नवरात्र संपली. दुसऱ्या दिवशी दसरा. अगदी आनंदाचा दिवस पण पहाटे आई उठल्या ते रडतच सगळ्यांना काही काळात नव्हते नंतर आईनी झाला प्रकार सांगितला कि त्यांना गुरु आज्ञा झाली व त्या प्रमाणे आईनी परवानगी दिली. ह्याच वेळात नौकरीचा राजीनामा द्यायचा होता. पैश्याचे देणे-घेण्याचे हिशोब करून सगळ्यांची पुढची व्यवस्था लावणे.आई वडिलांची जबाबदारी , लहान भावाला सांभाळणे , खूप कामे होती. त्यात नौकरीच्या जागी लगेच सोडू शकत नाही पण ते हि काम नीट झाले व २ डिसेंबर १९७६ हा कंपनी चा शेवटचा दिवस . ३ डिसेंबर १९७६ घर सोडायचा दिवस व आता पुण्याहून आपल्या जन्मगावी बेटावद ( धुळे ) जायचे . त्याच दिवशी स्वामीजी न त्यांच्या वडिलांनी एक रहस्य उलगडले क़ि गुरुनी त्यांना सांगितले होते कि तुझ्या घरी मागच्या जन्माचा एक योगी जन्माला येईल, शिकेल , नौकरी करेल संसार करेल आणि एक दिवस अचानक घर सोडून निघून जाईल त्याला घ्यायला मीच येईल . ( पण स्वामीजींच्या जन्माच्या ४ वर्ष आधीच वल्लीनाथानी देह त्याग केलेला सन १९४२) मग वडिलांनी सांगितले कि ज्ञानेश्वरी वाचून दाखव तिथपर्यंत आपला संबंध, नंतर नाही. मग वडिलांच्या आज्ञा प्रमाणे आवश्यक सामानाची ( १ जोडी कपडे , टॉवेल , ज्ञानेश्वरी , आसन ) मग वडिलांना विचारून ज्ञानेश्वरीचा कोणता अध्याय वाचायचा हे विचारले व सांगितले कि डोळ्यासमोर ज्या ओव्या असतील त्यापैकी दहा ओव्या वाच मग अजून एक लीला झाली ज्या ओव्या वाचल्या त्या म्हणजे " जेथिचिये अनित्यतेचि थोरी | करीतया ब्रम्हयाचे आयुष्यवेरी | कैसे नाही होणे अवधारी | निपटूनिया | हे ऐकून वडील चमकले कारण ज्ञानेश्वरी त्यांची अगदी कंठस्थ होती आणि स्वामी हि रोज ३०० ओव्या वाचायचे २ वर्षा पासून . आणि ते पुढचे ओव्या समजले आणि त्यांचा संयमाचाबंध सुटल व पोटाशी धरले व म्हटले कि घर सोडण्यापूर्वी भगवंतानी तुला आशीर्वाद दिला. माझ्या गुरुमहाराजांची आणिमाउलींची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे. प्रेमाने शेवटचा हाथ फिरवला व नमस्कार करून कोणाकडे न बघता घराबाहेर पडले तो दिवस होता ३ डिसेंबर १९७६ मग नवीन यात्रेची सुरवात झाली. पुणे सोडले व जन्मभूमीत म्हणजे बेटावद ( जिल्हा धुळे) येथे आले व सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ६ डिसेंबर १९७६ दत्तजयंतीला गृहस्थाश्रमातील सर्व नात्यांची बंधन कापून गुरूच्या शोधत पायी प्रवास सुरु केला पायी प्रवासात राहण्याचा, जेवणाचा, झोपण्याचा कधी प्रश्न आला नाही. कारण योगीराज वल्लीनाथांची कृपा तसेच वडिलांनी पूर्व आयुष्यात केलेल्या सत्कर्माचे फळ. त्यांना काय मिळाले हे माहित नाही पण पण ते स्वामीजींना मिळाले
साधारणत एक महिन्यानंतर गिरनारला पायी प्रवास करत पोहचले 'दत्ताशिखर' दत्तांच्या चरण पादुका! अधिकारी गुरु मिळावे; कुठे फसगत होऊ नये म्हणून दत्तांच्या शरणी. तेथील गदिपति अमृतगिरी महाराज हे नव्हते पण तेथला कारभार रामानंदगिरी बघत तिथे एक गुरुजींची भेट झाली ती भेट आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि जीवनदृष्टीसाठी त्यांचे मोलाचे व न विसरणारे उपकार झाले. आध्यात्माचे प्रचंड ज्ञान , रोज गुरुचरित्र वाचन, अध्यात्मातील गूढ रहस्य उलगडून सांगण्याची त्यांची विलक्षण हातोटी. तिथे अगदी पुत्रवत स्नेह मिळाला. त्यांचा व स्वामिजीचा संबंध तीन जन्मापासून आणि तिथे गुरूजवळ जाण्याआधी चांगली पूर्व तयारी करून घेतली. तिथे त्रिपुरा रहस्य, भगवदगीता , उपनिषद आध्यात्मिक ज्ञान समजून सांगितले कधी गुरुचरित्रावर सत्संग. एकदा असेच रामानंदगिरी सोबत भांडण झाले आणि खाली उतरत असताना अमृतगिरी बापूंची भेट झाली. डोळ्यात अश्रू आले त्यांना वंदन केले त्यांनी स्वामीजीना पुन्हा परत यायला सांगितले पण ह्या रागात गुरुजींना न सांगता ते खाली उतरले म्हणून गुरुजीना पण खूप वाईट वाटले . पण पुन्हा ४-५ दिवस त्यांनी जवळ घेऊन सांगितले कि दत्ताकृपेने अल्पशा सेवेने संतृष्ट होऊन वाचासिद्धी दिली आता परीक्षेची घडी व सांगितले कि प्राप्त झालेली सिद्दी जर लोकांकरिता वापरली तर तुझा मोठा मान-सन्मान होईल दर्शनाला मोठ्या रांगा लागतील पण तुला काय मिळेल ? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे " ज्या पायावर लोक डोक टेकवतील ते पाय इथेच जळून राख होतील, ते पाय तुझ्या बरोबर येणार नाही विचार कर तुला काय मिळेल " ह्याच शब्दांचा खूप परिणाम झाला फक्त त्या दिवशी नाही तर कायमचा. त्या नंतर गुरुजींनी या सिद्धीतून मुक्ती करिता दत्ताचारण पादुकाजवळ नेले व मंत्र म्हणत व हातातले जल दत्त पादुकावर सोडायला सांगितले व संकल्प केला नंतर मन खूप हलके वाटले व प्रसन्ना वाटायला लागले.
नंतरच्या काळातही दत्ताशिखरवर . नंतर साधनाकाळात हृषीकेशमध्ये गुरु महाराजंच्या सेवेत असताना किती तरी प्रकारच्या सिद्दी येत राहिल्या पण प्रत्येक वेळी गुरुजींचे शब्द कानावर यायचे. गुरुजींचे महान उपकार आहे. रामानंदगिरी सोबत भांडण झाले व खाली उतरताना जर कोणी नसते अडवले तर आज काय झाले असते हे विचार करून स्वामीजींनी अंगावर काटा येतो. तसेच अजून एक कृपा झाली ती म्हणजे कमंडलू कुंडाच्या सेवेत कोणीही स्री नव्हती. गुरुजींनी वैराग्यसंबंधी नवी दृष्टी दिली आणि ती आज हि तशीच आहे हे आपण स्वामीजी कडे बघून समजतो. तिथे असताना अमृतगिरीबापूचे वागणे कायम विचित्र वाटत असे १०-१२ मिनिटात बिडी पिणे अर्ध्या-अर्ध्या तासात घोटभर चहा. एकीकडे ते ब्रम्हनिष्ट वाटायचे कधी अर्धवट. व्यवस्थित बोलणे क्वचित बरगळने जास्त . मग मनात शंका आली नंतर गुरुजींनी त्याचे समाधान केले व दाखवले त्यांचे समाधी अवस्थेतील तेज . मग मनात विचार आले कि जी व्यक्ती दिवसभर पागलसारखी, विचित्रसारखी का वागते ? कशासाठी ? मग गुरुजीने सांगितले कि ज्ञानेश्वरी वाच पण तेव्हा त्याच अर्थ कळला नव्हता तसे स्वामीजी रोज ३०० ओव्या रोज वाचत. मग गुरुजींनी सांगितले कि अमृतगिरी बापू खूप मोठे अधिकारी सत्पुरुष आहेत. दत्त साक्षात्कारी ब्रम्हनिष्ट संत आहेत. नंतर गुरुजींनी आत्मज्ञानी पुरुषांच्या वेगवेगळ्या अवस्थांचे "बाल , उन्मत व पिशाच्य " वर्णन करून सांगितले. अनेक रहस्य उलगडली. तसेच नीट बघितल्यावर कळले कि बापू कधी बिडी पितच नव्हते. मग खुपदा निरीक्षण करून बघितले त्या दिवशी कळले कि ज्या दृष्टीने आपण बघतो ते वेगळेच . नंतर एक दिवस भाग्याचा दिवस उजाडला व बापूनी सेवेस बोलावले त्याच वेळी डोक्यात विचार चालू होते कि आपले गुरु कोण आहेत ? कुठे आहेत ? कधी भेटतील ? मनात विचार आला आणि बापूनी डोळे उघडले व रागावल्याचे नाटक करत म्हणाले "तू माझे पाय दाबतो कि गुरूला शोधतो आहेस?" तेव्हा आश्चर्य वाटले त्यानंतर जाण्यास सांगितले नंतर प्रेमाने आवाज आला हे पहा शांतीने भगवान दत्तात्रायंची सेवा कर वेळ आली कि सगळे सांगू."
मागच्या जन्माचे काही सुकृत असेल, या तीन अधिकारी संतांची विशेषकृपा लाभली. त्याशिवाय अजूनही काही ब्रम्हज्ञानी निजानंदात मग्न संतांचे दर्शन घडले त्यांचे दर्शन घडले पण सहवास लाभला नाही. पण अगदी थोडा सहवास लाभला निजानंदात मग्न अशा ऋषिकेश निवासी लक्ष्मणदास अवधूत या संतांचा. त्यांनीच सांगितले कि "बेटा तुझे तीव्र जिज्ञासा है तो एक दिन गुरु जरूर मिलेगा धीरज रखो मुमुक्षत्व और तितिक्षा तीव्र हो " भाग्याने त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, एक तास सत्संग झाला. भाग्यानेही कोणाला लवकर मिळत नाही ते स्वामीजीना मिळाले. तिथे खूप अनुभव मिळाले आणि त्याच अनुभवाची पुढे खूप मदत मिळाली. गुरु महाराजांनी घेतलेली परीक्षा त्यात टिकून राहायची पूर्वतयारी. आधी गुरुजींनी नंतर संतश्री लक्ष्मनदास अवधुतानी करून घेतली. या पूर्वीच्या पायी प्रवासात अनेक ठिकाणी आश्रमाधिपती , महामंडलेश्वर यांनी आडवळणाने , शिष्यामार्फत किवा स्वत:च स्पष्टपणे सुचवले होते पण लक्ष्मनदास अवधुतानी तसे सुचवले नाही . यामध्ये हा महत्वाचा एक फरक. ह्या जन्माचे असो कि मागच्या जन्माचे पुण्य पण ब्रम्हलीन वल्लीनाथ महाराज गुरुजी व अमृतगिरी बापूंची कृपा लाभली.
स्वामीजी गुरु महारांच्या चरणी कसे पोहचले व त्याची कसोटी कशी घेतली हे थोडक्यात लिहतोय. स्वामीजींना जे तीन सत्पुरुष म्हणजे महायोगी वल्लीनाथ , गिरनारला भेटलेले गुरुजी व संत अमृतगिरी . वल्लीनाथ हे इंदूरचे महायोगी माधवनाथांचे पट्टशिष्य . आई - वडिलांचे गुरु त्यांच्याच कृपेने व प्रेरणेने गृहत्याग सहजासहजी घडला. प्रत्यक्ष दर्शनाचा योग तर नाही घडला कारण जन्माच्या आधी शरीरत्याग केला होता . त्या आधी एक गोष्ट सांगायची राहिली स्वामीजी पुण्यात असताना महिन्यातून किमान एकदा तरी आळंदीला माउलींच्या दर्शनाला पायी ते पण अनवाणी जायचे. माउलीना एकच मागणे कि तुमच्या सारखा योगीराज गुरु द्या. त्यासाठी निदान दोन वर्ष तरी पायी गेले. नंतर प्रत्यक्ष शोधत निघाले. नवीन असताना गुरुवार करायचे नंतर गुरुचरित्र पारायण. गाणगापूर-नृसिंहवाडी- औदुंबराची यात्रापण झाली होती. दत्त आपल्यावर कृपा करतील व योग्य मार्ग दाखवतील कोठे फसवणूक होऊ देणार नाही म्हणून म्हणून गिरनार ला जायचे ठरवले होते. रस्त्यात व तिथे खूप अनुभव तर आलेच सोबत मजेशीर अनुभव हि आले.
पायी प्रवासात आत्मज्ञानी संतांचे दर्शन हि झाले त्या बाबतीत स्वामीजी खूप भाग्यवान. त्यातच एक म्हणजे बाबा जोगळेकर ( नर्मदा किनारी राहणारे कधि काळी स्वामींच्या घरी जेवायला येणारे ) , गिरनारचे संत अमृतगिरी बापू , तीर्थराज प्रयागमध्ये सच्चा बाबा महर्षी महेश योगी , ऋषिकेश , हरिद्वार व कनखलमध्ये लक्ष्मनदास अवधूत , मस्ताराम बाबा , मा आनंदमयी , वृंदावनचे पागल बाबा , ऋषिकेशच्या वास्तव्यास असताना डिव्हाईन लाइफचे शिवानंदाचे उत्तराधिकारी पू. चिदानंद व एक दुसरे महान संत सितारामदास ओकारनाथ त्या वेळी ऋषिकला नव्हते त्या मुळे दर्शन घडले नाही. जे ब्रम्हनिष्ठ होते हे कळते पण गुरु करायची मनात ओढ नसायची त्याला कारण गिरनार चे वास्तव्य , तेथील अनुभव , ह्या आधी सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी तीन जन्माचे नाते सांगितले होते. तसेच पुढच्या मार्गाची तयारी करून घेतली होती. तसेच गुरुपर्यंत पोहोचण्याचा उपाय हि सांगितला होता. तसेच एकदा ध्यानात बसवून एक मंत्र हि दिला त्याने ध्यानात गुरूंचे दर्शन झाले एक अत्यंत तेजस्वी वामन मूर्ती , संन्यास वस्र, मुंडण केलेली पाठीशी आशीर्वाद देत उभी आहे. पण त्यांना शोधायचे कसे व कुठे ? एके दिवशी गिरनारवर धो-धो पाऊस पडत होता अचानक अमृतगिरी बापूनी अचानक हाक मारून सांगितले चल तू आता खाली उतर, उत्तरेला जा . तुझे गुरु ऋषिकेशला गंगा किनारी वाट बघत आहे. त्यांनी पैसे दिले पण पैसे न घेताच पायी प्रवास सुरु केला. पायी प्रवासात ऋषिकेशला पोचायच्या आधी मथुरा - वृंदावन तीर्थस्थानांचे दर्शन करीत मथुरेला डोंगरे महाराजंची सात दिवस भागवत कथा ऐकली. ऋषिकेशला पोहचत एक महिन्याचा काळ लागला तोपर्यंत गुरु महाराज आपल्या स्थानी ( छापरा- बिहार ) निघून गेले होते .नंतर त्यांची भेट झाली व फक्त दोन प्रश्न विचारले कि बाबा तुम्ही गिरनारला कधी गेला होता ? ह्यावर ते हसून म्हटले कि "दोन वर्षापूर्वी" दुसरा प्रश्न विचारला कि तुम्ही श्रावण महिन्यात कुठे होते पुन्हा हसून सांगितले कि " ऋषिकेश गंगाकिनारी " दोन शब्दात उत्तर तिथे बघितले कि एक मंदिर आहे पण ते कोण दुसरयाचे. त्यांनी राहायला अनुमती दिली. तिथे एवढ्या थंडीत जानेवारीचा पहिला आठवडा काही अंथरायला नाही, पांघरायला नाही , रात्री खायला मिळाले नाही तरी काहीहि न बोलता रात्री फरशीवर तसेच शांतपणे झोपणे . त्या वेळीस एक दिव्य आत्मा सिद्धयोगी ( सिद्ध लोकातून ) प्रकट झाले व म्हणाले आम्ही ( महायोगी वल्लीनाथ ) याला पुण्याहून तुमच्या शरणी येथपर्यंत आणून पोचवले याचा स्वीकार करा . त्याच वेळी मा भगवती व भगवान दत्तात्रयांनीपण दर्शन देऊन हेच सांगितले. महाराजांनी चरणी आश्रय तर दिला पण कठोर परीक्षा अजून सुरु व्हायची होती. १५ दिवसा नंतर गुरु महाराजांनी अंथरण्यासाठी २ गोणपाठ मागवले बस. स्वयंपाकासाठी भिक्षा ( शिधा) मागून आणायची . झाडाच्या वाळलेल्या काड्या , जुनी खोकी.
पंधरा दिवसांनी एक जागा घेतली तिथे स्व:त गुरु महाराज राहायला येणार होते ( आश्रम ) ते शेतीची जमीन शहरापासून ३-४ कि. मी दूर . कच्चा रस्ता संध्याकाळनंतर रात्रभर त्या रस्त्यावर साप- नाग फिरायचे. संध्याकाळनंतर कोणी त्या रस्त्याला फिरायचे नाही . त्या रस्त्याला लागून आश्रमासाठी जमीन. जमिनीत एक नाला. त्यात खूप काटेरी झाडे. साप- विंचवांची गणती करण्याचा प्रश्न नाही. गुरुमहाराजंच्या आज्ञेने त्या नाल्यातील काटेरी झाडे- झुडपे फावड्याने व कुऱ्हाडीने दूर करायची आसपास मिळेल तेथून माती आणून तो नाला भरायचा. कोणी मदतीला नाही ना पैसे. सुरवातीला भयावह साप - विंचूचे भयावह दर्शन झाले दर्शन ते बघून कोणालाही भय येईल असे त्या काळी न कुठली साधना न भयमुक्ती झालेली नुकताच गृहस्थाश्रम सोडलेला फक्त एक वर्ष एक महिना झालेला. रात्री झोपायला काही नाही बाजूला सापांचा सुळसुळाट तरी थकव्याने ईश्वरावर व गुरुमहाराजंवर पूर्ण श्रद्धा ठेवून शांत झोपणे. सकाळी उश्याजवळ नाग फणा काढून डोलत होता. पण उठल्या नंतर तो निघून गेला . पण पलंगाखाली फणा काढून बसायचा. जणू काही साप-नाग-विंचू व इतर प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी ते बसायचे. गुरुमहाराजांचा अधिकार ,सामर्थ्य, संतपुरुषाच्या विलक्षण लीलेचा अनुभव झाला. होळीच्या आता कुटी बांधून झाली नंतर गुरु महाराजांना घेऊन आले. नंतर गुरु कृपेने स्वामीजींना एक झोपडी तयार केली. गुरुमहाराजंच्या जवळ राहण्याचा त्यांची सेवा करण्याचा तो जीवनातील सर्वोच्च्य आनंदाचा अविस्मरणीय क्षण होते. गुरुमहाराजांच्या करुणेचा , प्रेमाचा , अविरत सतत धारेचा , मृद, शांत , सौम्य स्वभावाचा अनुभव मिळत होता. म्हणजे गुरु करुणा कशी असते ते कळले.
स्वामीजींना अनेक अनेक अनुभव आले तसेच मा भगवती व गुरुकृपेने जीवन धन्य झाल्याचा आनंद चेहऱ्यावर बघू शकतो. ह्या प्रवासात अनेक घटना घडल्या अनेक साधू भेटले आणि काही गमती पण कळल्या.
( पुढील काही महिन्यात अजून अनुभव प्रसिद्ध केले जातील जे आपणा सगळ्यास प्रेरणादायी ठरेल )
( पुढील काही महिन्यात अजून अनुभव प्रसिद्ध केले जातील जे आपणा सगळ्यास प्रेरणादायी ठरेल )

