Monday, February 17, 2014

स्वामीचरण


                                                         
ॐ श्री गुरु चरण क्म्लेभयो नमः"


स्वामीजी आपणास दंडवत प्रणाम 

स्वामीजी मी आपल्या किती योग्य आहे हे मी जाणत नाही पण मी आपणास मी माझे गुरु मानतो व मी आपल्या चरणी काही सेवा मागतो. हे मागण्यात माझा काही स्वार्थ आहे पण ह्याला स्वार्थ म्हणा किवा हट्ट. (आपण माझा हा हट्ट पुरवणार  हि आशा मी बाळगतो )  आपण माझे गुरु आहे आणि एका शिष्याला गुरुचरणी स्थान मिळाले तर त्याचे परम भाग्य कारण सगळे तीर्थ हे गुरु चरणा पासून निघतात.हे मी जाणतो. आपल्या चरण कमलची धूळ हि संसार सागर पार करायला एक सेतू सारखी आहे अश्या माझ्या पुज्य गुरुचरणी मी नमन करतो. आपल्या चरणाची धूळ , एक कण मात्र सर्वस्व देण्याचे सामर्थ्य ठेवते हे मी जाणतो. आपल्या चरणांचा आश्रय आणि चरण धूळ मिळावी कारण माझ्यात अजून श्रद्धा व भक्तीभाव विकसित व्हावा. आपल्या चरणांनी सेवा  मला माझ्या लक्ष्याची प्राप्ती सहज शक्य होईल. आपल्या चरण कमलांची सेवा माझे सगळे जीवनातील अंधकार नष्ट होईल व भक्तीस योग्य होईल. आपण  सूर्यासमान आहात व कृपेचे समुद्र आहात. आपली कृपा होईल तर वाईटतले वाईट लोक सुधारतात, आपण खूप दयाळू आहात तसेच दयेचे सागर आहात.  आपल्या आशीर्वादाने खूप लोकांचे कल्याण झाले मग आता मी का वंचित राहावे ? मला आपण शरण घ्यावे हीच विनंती. आपली चरण धूळ हि काही साधारण नाही ती एक अमृततुल्य आहे. हे अमृत हि जडी बुटी माझ्याकरिता संजीवनी जडीबुटी आहे. जी परमशक्ती संपन्न आहे मी ह्याला हृदयापासून स्वीकारू इच्छितो ज्याने मी माझ्या परम लक्ष्याची प्राप्ती करू इच्छितो. आपण माझे जीवन सार्थक करावे हि नम्र विनंती. 

आपली सेवा घडावी ह्याहून काही बाकी राहील असे आयुष्यात काही नाही. आपल्या चरण प्राप्तीने मी माझे जन्मा-जन्मांचे  पाप मिटेल ह्याहून काय जास्त सौभाग्य असेल ? तरी आपण मला आपल्या सेवेलायक बनवावे आणि आपलेसे करावे. स्वामीजी आपल्या चरण सेवेने माझ्यातले सगळे अज्ञान मिटेल आणि मला ज्ञान प्राप्ती तसेच वैराग्य मिळेल मग मला काही करायची गरज नाही. आपल्या चरणात जर सगळ्या तीर्थाचे पुण्य मिळत असेल तर मग मी कुठे का जावे ?आपल्या चरणी जर अर्थ, धर्म , मोक्ष प्राप्ती होत असेल तर मग मी काय करावे हे कृपया सांगावे. मला माझ्या मानव जीवनाचे सार्थक करायचे आहे आणि हे फक्त आपल्या चरणांच्या आश्रयाने शक्य आहे.

स्वामीजी मी हे जाणतो कि आपल्या चरणाची धूळ डोळ्यांना लावली तर ज्ञान प्राप्ती सहज शक्य होते आणि मला ह्या नेत्रांनी आपले व्यापक स्वरूपाचे दर्शन करायचे आहे. स्वामीजी माझी आपल्यावर खूप श्रद्धा, प्रेम आहे आता ह्या प्रेम रुपी ज्योतीला कायमचे प्रकाशित ठेवा हि नम्र विनंती. मला अजून समजत नाही कि मी आपले काय भजन करावे आपले ध्यान कसे करावे, सेवा , पूजा कशी करावी हेही समजत नाही आपली चरण सेवा मिळाली तर हे अगदी सहज शक्य आहे. माझे हे प्रेम अतूट श्रद्धा आपल्या दयेची वाट बघतेय. आपण दयासागर , प्रेमसागर, करुणासागर आहात. हनुमान चालीसा मध्ये म्हटल्या प्रमाणे "श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जो दायकु फल चारी" .गुरु चरणाची धूळ शिष्याच्या  मन  रुपी दर्पणाला पवित्र करते आणि जे चार फळ  ( धर्म, अर्थ , काम , मोक्ष ) देणारे आहेत.  स्वामीजी  मला आपल्या चरण कमळांचा आश्रय द्यावा हि पुन्हा पुन्हा विनंती करतोय. तुम्ही माझे अंधकारमयी डोळे  उघडले आहे आणि दिव्य असे ज्ञान आपण देत आहात आणि ते अजून घेण्याची इच्छा बाळगतोय कारण आपण माझे आध्यात्मिक गुरु आहात. स्वामीजी आपण माझ्या करता अजून दयाळू व्हा व आपला कृपा आशीर्वाद द्या कारण मी पतित आहे आणि आपण पतित पावन आहात. स्वामीजी  आम्ही अज्ञानी आहोत आणि आपण ज्ञानाचे प्रकाश.

बंदउँ गुरु पद कंज कृपा सिंधु नररूप हरि।
महामोह तम पुंज जासु बचन रबि कर निकर॥
मी माझ्या स्वामीजीच्या चरण-कमलांची वंदना करतो जे कृपासागर आहेत. मनुष्यरुपात साक्षात भगवान आहेत. ज्यांचे वचन अंधकार रुपी महान मोहाचा नाश करण्याकरिता आपण सूर्यकिरण समान आहात . आपण ज्ञानाचे रूप आहात, आपण उन व सावली आहात  आपल्या शिवाय मन व्याकूळ होते, माझे तन मन आहात आपण आपले काय  मोल आपण तर अनमोल आहात आणि आपली चरण धूळ हि तेवढीच अनमोल. 

गुरु महत्व संत शिरोमणी तुलसीदासानी रामचरितमानस मध्ये  लिहले आहे 


गुर बिनु भवनिधि तरइ न कोई।
जों बिरंचि संकर सम होई।।
भले हि कोणी ब्रम्ह,शंकर समान असेल तरी गुरुशिवाय भाव सागर पार नाही  करू  शकत. धरतीच्या आरम्भा पासून गुरु ची अनिवार्यता वर प्रकाश टाकला आहे वेद, उपनिषिद , पुराण, रामायण, गीता अगदी सगळ्या ग्रंथात गुरु महिमा सांगितली आहे. गुरु आणि भगवान ह्यात  काही अंतर नाही अश्या माझ्या गुरु स्वामी सवितानंद जे साक्षात भगवंत आहेत ह्यांना मी प्रणाम करतो.
बंदउँ गुरु पद कंज कृपा सिंधु नररूप हरि।महामोह तम पुंज जासु बचन रबिकर निकर।।
अर्थात गुरु मनुष्य रुपात स्वत: नारायण आहे आणि ते माझे आराध्य  दैवत  आहे. मी आपल्या चरण कमलाना वंदन करतो. जसे सुर्य निघाल्यावर अंधार नष्ट होतो तसेच आपल्या वचनांनी  मोहरूपी अंधकाराचा नाश होतो.
स्वामीजी  आम्ही नीट विधी जाणत नाही तर मग आपली पूजा कशी करावी हे हि आपणच सांगावे कारण अविधीपूर्वक केलेले  कार्य कसे फळ  देणार ? आपण आम्हाला विधी सांगावा  हि आपल्या चरणी प्रार्थना. ह्या भौतिक  जगात आम्हांला कोण तारणार आपल्याशिवाय आमचे आहे कोण ? सगळ्यात मोठे तीर्थ आपण आहात. आपल्या कृपेचे फळ आपण द्यावे जेणे करून अध्यात्मिक प्रगती करू शकू. आपले चरणामृत म्हणजे गंगाजल आहे व ते मोक्ष प्रदान करणारे आहे हे आम्ही जाणतो.

तीरथ गए तो एक फल, संत मिले फल चार।
सदगुरू मिले तो अनन्त फल, कहे कबीर विचार।।

भगवान  श्रीकृष्णांनी भगवद गीतेत असाच एक संदेश दिला आहे  
न विद्या येषां श्रीर्न शरणमपीषन्न च गुणाः
परित्यक्ता लोकैरपि वृजिनयुक्ताः श्रुतिजडाः।
शरण्यं यं तेऽपि प्रसृतगुणमाश्रित्य सुजना
विमुक्तास्तं वन्दे यदुपतिमहं कृष्णममलम्।।

ज्यांच्या जवळ न विद्या आहे न धन आहे न कुठला सहारा, न त्यांच्यात कुठले गुण आहेत न वेद शास्राचे ज्ञान. त्यांना संसारी लोकांनी पापी म्हणून त्यागले आहे असे प्राणी त्या प्रभूच्या शरणी येतात ते संत बनून जातात व मुक्त होऊन जातात अश्या त्या भगवंताला प्रणाम करतो. ( इथे मी इतकेच म्हणेल आपणच ते भगवान आहात आणि आपण हि माझा उद्धार कराल हे नक्की )
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। (18.66)
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥
भगवंताच्या वचनाप्रमाणे संपूर्ण संपूर्ण धर्माचा आश्रय  त्याग करून जो शरण येईल त्याला मुक्ती मिळेल
( अर्थात  काय करायचे काय नाही करायचे हे सोडून.  ‘धर्म’ शब्द कर्तव्य-कर्म  वाचक आहे  )

श्रीगुरुंची अनेकानेक रुपे-स्वरुपें पाहतां पाहतां श्रीगुरु अरुपातच विलीन होऊन राहतात. श्रीगुरु काय ?  याची संकल्पना आठवू म्हटले तर शेवटी एवढेच जाणवते - "गुरु तेथे ज्ञान".
‘गुरु’ ही दोन अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते तशी किंवा त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले व आपल्याला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत. अशा शब्दात गुरूचे मोठेपण आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. अश्या माझ्या सदगुरूना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो.
गुरु म्हणजे अक्षरे दोन । अमृताचा समुद्र जाण ।
तयामध्ये बुडताची क्षण । केवी होय परियेसा ॥


           गुरूची पदसेवेने मनुष्य सर्व पापापासून विशुद्धात्मा होऊन ब्रम्हरूप होते हे जाणतो पण मला तो अनुभव आपणा कडून घ्याचा आहे आणि आपली मर्जी असेल तर हे सहज शक्य आहे.
अज्ञानाचे मूळ उखडून टाकणाऱ्या , अनेक जन्माच्या कर्माचे निवारण करणाय्रा, ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करणाऱ्या गुरुदेवांच्या चरणअमृताचे पान केल्याने हे सहज शक्य होते ह्या करता आपली कृपा पाहिजे ती आपण द्याल तर मी धन्य होईल. 
           ह्या जगात गूढ , अविद्यात्मक, मायारूप आहे आणि हे शरीर अज्ञानामुळे उत्पन्न झाले आहे ह्याचे ज्ञान हे केवळ आपल्या कृपेमुळे होऊ शकते आणि आपण माझी योग्यता बघून हे ज्ञान द्यावे हि मागणी.
आपल्या आश्रमात यायची इच्छा आता पूर्ण होणार आहे आणि आपले निवासस्थान म्हणजे साक्षात काशी, वैकुंठ धाम आहे.
            आपण साक्षात हे भगवान विश्वनाथ, विष्णू आहात. आणि निश्तितच साक्षात तारक ब्रम्ह आहात. आपली सेवा म्हणजे तीर्थराज गया आहे. आपले शरीर म्हणजे वटवृक्ष आहे. आपले चरण म्हणजे विष्णूंचे चरण आहे. तेथे लावलेले मन तदाकार होऊन जाते.साक्षात ब्रम्ह गुरुदेवांच्या म्हणजे आपल्या मुखातून ( वचनामृत) स्थित आहे. विद्या हि आपल्या मुखातच राहते आणि ती फक्त मी भक्तीने प्राप्त करू शकतो आणि ती मी करतोय आणि आपला आशीर्वादाचे मला लवकर प्राप्त होईल हि आशा मी बाळगतो. आपण माझे गुरु आहात आणि गुरु ह्या शब्दात खूप काही दडलाय जास्त "गु" कार शब्दाचा अर्थ अंधकार ( अज्ञान ) आणि "रु" शब्द म्हणजे ज्ञान. अज्ञान नाहीसे करणे ब्रम्हरूप प्रकाश आणि गुरु म्हणजे आपण आहात.  तसेच "गु" कार अंध:कार आहे आणि त्याला दूर करणारा "रु" कार आहे. अज्ञानरूपी अंध:काराला नष्ट करतात म्हणून आपण गुरु. "गु" कार म्हणजे गुणातील "र" कार म्हणजे रूपातील गुण आणि रूप ह्यांच्यापेक्षा  वेगळे असल्या मुळे "गुरु". आपण म्हणजे श्रुतिरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित चरणकमलांचे आहे. आणि आपण वेदांताच्या अर्थाचे प्रवक्ते आहात म्हणून आपली पूजा सदैव केली पाहिजे. आपण पुज्यनिय आहात.
संसाररूपी वृक्षावर चढलेले लोक नरकरुपी सागरात पडतात त्या सर्वांचा उद्धार करणारे गुरु आपणस माझा नमस्कार असो. संसाररूपी अरण्यात प्रवेश केल्यानंतर दिग्मूढ स्तिथिमध्ये  ( जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही ) चित्त भ्रमित होते त्यावेळी गुरूच म्हणजेच आपणच मार्ग दाखवतात. आपणास नमस्कार असो. ह्या पृथ्वीवर त्रिविध तापरुपी अग्नीने जाळल्यामुळे अशांत झालेल्या प्राण्यांसाठी गुरुदेव म्हणजे आपण एकमेव उत्तम गंगाजी आहात. आपणास माझा नमस्कार असो. स्वामीजी आपण त्रिनेत्ररहित ( दोन नेत्र असलेले ) शिव आहात, दोन हात असलेले भगवान विष्णू आहात आणि एक मुख असलेले ब्रम्हदेव आहात.
तप आणि विद्येच्या बलामुळे आणि महा अहंकारामुळे जीव ह्या संसारात राहटाप्रमाणे सतत फिरत असतात कारण ते गुरुतत्वापासून पराड्मुख झाले आहे. गुरुसेवेमुळे विमुख झालेले गंधर्व, पितृ, यक्ष, चरण, ऋषी, सिद्ध आणि देवता आणि आदी देखील मुक्त होणार नाही हे जाणतो म्हणून आपली सेवा मिळावी हि वारंवार विनंती आहे. 
         स्वामीजी मला माझ्या मनाची शुद्धी करायची आहे ते खूप दुषित झाले आहे आपण जर एक छोटी कृपा केली तर हे सहज शक्य होईल ते म्हणजे आपले उपदिष्ट जर मिळाले तर...
इथे जास्त सांगण्यात काय लाभ ? श्री गुरुदेवाच्या परम कृपेविना करोडो शाश्रामुळे देखील चित्ताची विश्रांती दुर्लभ आहे. आपली कृपा झाली तर आपल्या करुनारूपी तलवारीच्या प्रहाराने माझ्या आठही पाशाना ( संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ट , कुळाभिमान आणि संपत्ती ) तोडून निर्मल आनंद द्या. कारण अजून मी पूर्णपणे तो निर्मल आनंद नाही घेऊ शकत. मला आपल्या चरण कमलांची सेवा द्या म्हणजे मी ह्या दृश्य प्रपंचाची विस्मृती होईल.स्वामी मला आपला दास बनवून घ्या हि नम्र विनंती.
          हे गुरुदेव, स्वामीजी मुनी , पन्नग आणि देवतांच्या शापापासून आणि यथाकाल आलेल्या मृत्युच्या भयापासून आपणच वाचवू शकाल हे मी जाणतो. आपल्या सामर्थ्या बद्दल मी काय बोलावे ? आपण नित्य, निर्गुण, निराकार, परम ब्रम्हचा उपदेश देतात जसे एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करतो त्या प्रमाणे आपण शिष्यात ब्रम्ह्भव पंगत करवितात. आपल्याच कृपेने शिष्य आत्मज्ञान प्राप्त करतो.आपण अद्वितीय , नित्य, ज्योतिस्वरुप, निरोग , निर्मल , परम आकाश स्वरूप , अचल, आनंदस्वरूप , अविनाशी, अगम्य, अगोचर, आहात. तसेच आपण ज्ञान , वैराग्य , ऐश्वर्य, यश, लक्ष्मि आणि मधुर वाणी या सहा गुणांनी  ऐश्वर्याने संपन्न आहात.

          आमच्यासाठी आपण शिव आहात आपणच विष्णू आहात आणि आपणच ब्रम्हा आहात. आपणच बांधव आहात. आपणा शिवाय अन्य काहीही नाही. आपण कामनारहित, शांत, चिंतारहित, इर्ष्यारहित आणि बालकाप्रमाणे आहात. जे सुख आपल्या श्रीचरणी जे वेदांत निर्दिष्ट सुख आहे ते सुख चार्वाक मतामध्ये नाही , वैष्णव मतामध्ये नाही.आणि प्रभाकर ( संख्या) मतामध्ये देखील नाही.आपण ब्रम्ह्रसचे पण करून जे परमात्म्यात तृप्त झाले आहात त्यामुळे आपल्यापुढे इंद्रही गरीब आहे मग राजाची तर गोष्टच सोडा. 
गुरु म्हणजे आपणच सत्वगुणी होऊन विष्णुरूपाने जगताचे पालन करतात, रजोगुणी होऊ ब्रम्हरूपाने जगताचे सर्जन करतात आणि तमोगुणी होऊन शंकर रूपाने जगताचा संहार करतात. मला आता आपले पुन्हा दर्शन देऊन आपल्या कृपाप्रसादाने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकाकी, नि:स्पृह आणि शांत होऊन राहायचे आहे. आपण मला वारंवार आपल्या आश्रमावर बोलवावे, आज्ञा द्यावी कारण आपण जिथे राहता ते स्थान म्हणजे पुण्यतीर्थ आहे.मी आज जरी शंकराच्या पूजेत किवा श्रीकृष्णाच्या पूजेत असलो परंतु आपल्या म्हणजे गुरुतत्वाच्या ज्ञानाने रहित असलो तर हे सगळे व्यर्थच ना ?मी आपल्या योग्य नाही म्हणून मी दीक्षे बद्दल काही बोलत नाही. 
              सर्व प्रकारच्या प्रयत्नापासून अनासक्त होऊन शास्राचे मायाजाल सोडून आपला आश्रय घ्यायचा आहे फक्त आपण अनुकुलता दाखवावी हि विनंती. स्वामीजी आपण "परम गुरु" आहात  कारण आपण संशयाचा मुळापासून नाश करतात. आपण चतुर आहात जन्म , मृत्यू , आणि भय याचं विनाश करतात कारण आपण परम गुरु आहात आपण "सदगुरू" आहात. असे म्हणतात कि अनेक जन्मामध्ये केलेय पुण्यामुळे असे महागुरू प्राप्त होतात ( मी काय पुण्य केले हे आपणच जाणतात कारण मी अजून हि पतित आहे पण आपण पतित पावन आहात ) ( जगात अनेक प्रकारचे गुरु आहे जसे सूचक गुरु , वाचक गुरु , बोधक गुरु , निषिद्ध गुरु , विहित गुरु कारनाख्या गुरु  परंतु आपण परमगुरु , सदगुरू , महागुरु आहात ) ज्या प्रमाणे सर्व जलाशयामध्ये सागर राजा आहे त्याच प्रमाणे आपण सर्व गुरुमधे "परम गुरु" राजा आहात 
           मोहादि दोषांनी रहित, शांत, नित्य तृप्त , कोणाच्याही आश्रयाने रहित अर्थात स्वाश्रयी, ब्रम्हा आणि विष्णूच्या वैभवाला देखील तृणवत समजणारे आपण "परमगुरु" आहात. सर्व काळ व सर्व देशात स्वतंत्र, निश्चल, सुखी अखंड एका रसाच्या आनंदाने तृप्तच खरोखरच परम गुरु आहात. द्वैत आणि अद्वैतापासून मुक्त, आपल्या अनुभवरूप प्रकाशाचे, अज्ञानरूपी अंध:काराचे छेदन करणारे परमगुरु आहात. ह्या लोकात दोन तत्वज्ञ आहे एक मौनी आणि वक्ता. मौनी गुरुद्वारे लोकांना लाभ होत नाही परंतु आपण आपण वक्ता आहात आपण भयंकर सन्सर्सग्रतुन पार करण्यास समर्थ आहात. कारण शास्त्र, युक्ती ( तर्क ) आणि अनुभूतीने आपण  सर्व संशयाचे छेदन करतात. 
              मृत्युच्या वेळीस कुल , धन , बाल , शास्र , नातेवाईक , बंधू हे सर्व मृत्युच्या वेळी कामास येत नाही एकमात्र गुरुदेवच तारणहार आहे अश्या गुरूस माझा नमस्कार. आपली सेवा मिळाली तर माझे कुळदेखील पवित्र होईल. गुरूच्या तर्पणाने ब्रम्ह आदी देव तृप्त होतात हे मी जाणतो. आपल्या कृपेने हृदयाची ग्रन्थि छीन्न होते सर्व संशय समाप्त होतात आणि सर्व कर्म नष्ट होतात.

आपली भक्ती केल्याने भक्त हा घोर पापातून मुक्त होतो. ह्या जगात सात कोटी महामंत्र विद्यमान आहेत ते सर्व चित्ताला भ्रमित करणारे आहेत. "गुरु" नावाचा दोन अक्षरी मंत्राच एकमेव महामंत्र आहे. मला आता आपण कृपा द्यावी व ह्या मार्गात प्रगती करिता आपण आपले चरणामृत पान करु द्या तसेच आपल्या जेवणातील उरलेले अन्न द्या म्हणजे प्रगती लवकर होईल. ब्रम्हा, विष्णू आणि शिवसहित समग्र जगत गुरुदेवमधे म्हणजेच आपणात समाविष्ट आहे आपल्या पेक्षा काही श्रेष्ट नाही म्हणून आपली पूजा घडू द्या. गुरूच्या अर्थात आपल्या कृपाप्रसादाने ब्रम्हा, विष्णू व शिव यथाक्रम जगाची सृष्टी स्थिती व लय करण्याचे सामर्थ्य प्राप्त करतात. " गुरु " हा दोन अक्षराचा मंत्र सर्व मंत्रामध्ये राजा आहे, श्रेष्ट आहे. स्मृती, वेद आणि पुराणांचा तो सारच आहे ह्यात काही संशय नाही. हे गुरुमाउली अज्ञानरुपी अंध:कारात अंध बनलेल्या आणि विषयामुळे आक्रांत चित्त झालेल्या मला ज्ञानाचा प्रकाश देऊन कृपा करावी 


“भावेवीण देव न कळे नि संदेह। 
गुरुविण अनुभव कैसा कळे॥”

भाव नसला तर देवाची महती कळणार नाही हे नि:शंक आहे. 
तसेच गुरु नसेल तर अनुभव कळणार नाही हे नि:शंक आहे.
तसेच गुरु नसेल तर अनुभव कळणार नाही हे अलिखित ‘सत्य’ आहे. 
‘प्रकाशाशिवाय अंधार कस जाणार? 
औषधाशिवाय रोग कसा हटणार? 
प्रेमाशिवाय कलह कसे मिट अणार? 
गुरुविण नाही दुजा आधार.
हे गुरु माउली आपण कृपया आपल्या चंरण कमळांचा जागी मला आश्रय द्यावा. आता हेच मागणे मी आपणास  पुन्हा मागतो.  

रडता-पडता कोठे अडता तोच नेतसे पार
गुरुविण नाही दुजा आधार
गुरु परमेश्वर गुरु माऊली
सदा कृपेची देई साऊली
भक्तांसाठी गुरु होऊनी देव घेई अवतार
स्मरण करावे नाम वदावे
वंदन पूजन करीता भावे
प्रसन्न होते गुरु माऊली सुख दे अपरंपार
शरण तुम्हाला आम्ही प्रभूवर
जगा दिसू द्या तुमचे अंतर
जड मायेतून सत्यरूप तव होऊ द्या साकार



गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट
अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले काटेबन घनदाट
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी, लोचन काठोकाठ
भुकेजलो मी, तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
सांजेपाठी सुदीर्घ रजनी, दिसणे कुठून पहाट
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये स्वामीराया  सांभाळी मज, दावी रूप विराट


परमेश्वर रागावला तर गुरु वाचवू शकतात ,परंतु गुरु कोपले तर मात्र कोणीही वाचवू शकत नाही.

मानवी जीवनात अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजा मानल्या जातात पण त्या शिवाय एक अत्यंत महत्वाची गरज असते ती सद्गुरू चरणां पाशी आश्रयाची ती आधी प्राप्त झाली कि काहीही मिळवायचे रहात नाहीच तसेच या शिवाय जीवनात काहीही मिळत नाही हेही तितकेच खरे म्हणून आपल्या चरणी जागा  मिळावी हि विनंती...तुजवीण स्वामी मज कोण तरी 

हृदयी वसली गुरुमूर्ती 

नित्य होईल शब्दपुजेची उत्पती
मन विचलित न होऊ देती 
सौजन्य आणि सहनशीलता शिकवती 
जय जय स्वामी सवितानंदांची मूर्ती

प्रदक्षिणा 
उत्पती हा गुरु विचार 
प्रदक्षिणा राखती स्थिती 
प्रदक्षिणा थांबता लय असे निश्चिती 
प्रदक्षिणेचे अनेक प्रकार 
काही असती गोलाकार गुरु भोवती 
काही नाम जपे वारंवार गुरु कृपा अनुभवाती 
ध्यान मार्गे देखील होते गुरु प्राप्ती 
गुरुनाम जपे पृथ्वी प्रदक्षिणा निश्चिती 


गुरु मूलाधार
गुरु हाच  आधार , गुरु हेच मूलाधार
गुरुच  करविती निर्धार,
सात्विक मनास देती आकार
करविती ज्ञानार्जनास तयार
माझ्या गुरूंचे चरण
सर्व सत्कार्याचे, सद्विचारांचे  प्रेरणा स्थान
नकळत होती निवारण दुख संकटांचे
गुरु माउली चे नुसते स्मरण
केवळ आनंदाचे उधाण

स्वार्थ हा विषय गौण बंध सगळे गळून पडिती
 उरत नाही सभोवतीची जाण
असो मग कुठलेही ठिकाण, मन स्थिर असो वा सैरभैर
नेत्री भरून येती नीर,होता गुरुमूर्ती ची आठवण
सत्य ती तुकोबाची वैखरी, शब्द न शब्द खरी
"रम्य तो ठाय, जेथे आठविती स्वामीचे पाय… "
जे तुकोबांनी अनुभविले, ते यथार्थ कथिले, मूर्तिमंत चित्र उभारिले, डोळ्यासामोरी
आता उरली न वर्णनाची जरुरी,  हि गुरुमूर्ती खरी
मायाळू तितकिच करारी,  उपमा न त्यासी दुसरी
अनुष्ठान करिती निर्धारी, चंदन गंध आपोआप पसरतो, 
प्रेम, माया, सगळी सारखी सर्वावरी, उत्कृष्ठ मार्गदर्शन व्यवहारी
स्वामीजीस  सत्कार्याची आवड न्यारी, निर्धाराने करिती उत्कृष्ठ योजना आणि पूर्वतयारी
जगदंबेची  पूर्ण कृपा त्यावरी, यश येते प्रत्येक कार्यी.

ध्यास 
आता लागू दे ध्यास, होऊ दे अभ्यास
का माळिले हे जीवन या कारणाचा
वंदावे गुरुचरण तेच करतील निराकरण पडल्येया सर्व प्रश्नांचा

उपासना 
आपण करावी भक्ती, सर्व करील शक्ती, हीच खरी युक्ती असे उपासनेची
नित्य उपासना हा असावा ध्यास, ठरलेल्या वेळेस खास, तोच करवील अभ्यास, गुरुंनी सांगितलेल्या मार्गाचा
नित्य उपासना होता थोर, श्वास होऊ लागतो स्थिर, येऊ लागतो धीर, मनास गुरु आधाराचा
श्वास होता स्थिर, आवेग होतो हळू , वासना लागती जाळू, आता वाटते नाही पळू , मागे कशाच्या
श्वास होता स्थिर, मन म्हणते मागे फिर, उगा नको धावू समोर गाठण्या वृक्ष मोहाचा
धावत जाता समोर, मन आवेगे करिता जोर, पुढे आहे दरी थोर, सार न त्यात किमिप,
त्यातच अंत ह्या भ्रमाचा
आता लावावी सर्व शक्ती, नित्य उपासनेत निश्चिती, तीच करवील भक्ती, दाखवील मार्ग गुरुकृपेचा
उपासना घडता थोर, मनी पक्का होतो निर्धार, संशय होतो हद्दपार, निर्भय आणि निर्मळ होते मन
निर्भय आणि निर्मळ मनात, स्थिर होते उत्तम विचार धन, तेच खरे साधन असे गुरु प्राप्तीचे 
गुरूच देतील ज्ञान, करतील शंका समाधान, पटवून देतील कारण, देऊन प्रचीती आणि उद्हारण
ह्या जन्म प्राप्तीचे

गुरु स्मरण 
जाहले ते गुरुस्मरण, गुरूंचे परम पवित्र चरण
अतीव आनंदाचे स्फुरण , गुरुवंदनेचे 
विचार 
मनात येती कित्येक विचार 
एकही स्थिर न राहती साचार 
महाराज एकाच भाव करावा स्थिर
आपल्या पूज्य गुरु चरणांचा 
गुरु चरणांची पूजा व्हावी अपार
हेची दान देगा गुरुराया, हातून सत्कार्य व्हावे 
सत्कार्य हातून झाल्यावर त्याचा मला ताबडतोब विसर व्हावा 
मी कार्य केल्याचा भाव कार्यासोबतच संपवा 
माझ्या कर्तुत्वाच्या आठवणीचा, क्षणात विसर पडावा 
"मी" केले म्हंटल्यावर अहंकार येतो 
कळत नकळत केलेल्या प्रत्येक कार्याशी हा "मी" स्वतःला जोडतो 
हळूहळू हा "मी" पणाचा भाव ऋणानुबंध तोडतो 
जेव्हा पण "मी" म्हणीन तो "मी" म्हणजे गुरुराव असावा 
मी कार्य केल्याचा भाव ताबडतोब संपवा
गुरुराया आशीर्वाद असावा 
मनी असावी एव्हडीच आशा 
सतत तुझ्या मार्गावर चालावे, योग्य राहावी दिशा 
आशेतून अपेक्षा हा भाव न यावा 
हातून होऊ नये कोणाचीही, कधीही  उपेक्षा 
अपेक्षेतून बरेचदा आपण आशाळभूत होतो 
गरज नसताना हि माणूस मनातून पराभूत होतो 
अपेक्षेचा भाव संपवा हेच नेहमीच बरे  त्यापेक्षा 
गुरुराया आशीर्वाद असावा, सतत तुझ्या मार्गावर चालावे, आणि योग्य राहावी दिशा

माझे सदगुरू परम पूज्य श्री स्वामी सवितानंद हे अतिशय प्रेरणादायी उर्जेचा स्त्रोत आहेत.
सदगुरू हाच श्वास 
सदगुरूच खरा विश्वास 
भरील प्रत्येक मनात निश्चय आणि साहस 
तुझ्या  प्रतिभे ची  स्तुती 
करताना कमी पडते माझी गती, 
शब्दपूजा बांधण्यात, मी कमी पडत असे 
तुझ्या कृपेची शक्ती, साठवून ठेवण्यास काय करावी मी युक्ती 
कुशी उमटलेले बरेच बोल, मी विसरून जात असे 
आता गुरुराया आणखी थोडी  कृपा करावी
स्फुरलेल्या शब्दांची विस्मृती  न व्हावी 
शब्दपूजा  तुझी व्यवस्थित व्हावी 
चरणी तुझ्या नित्य लागावी
गुरु देती ज्ञान  होते शंकासमाधान  नष्ट होते अज्ञान  
होते चित्त शुद्धी जीतके येतील वाईट विचार  
तितक्यांदा करीन सदगुरुदासनामाचा उच्चार 
सदगुरु नाम जपाने  होईल मन प्रसन्न
प्रसन्न मानाने होईल सत्कार्य ंपन्न 
प्रसन्न मनात येतील सुविचार 
सुविचारांनी साकारेल शुद्ध आचार 


 !!!श्री स्वामी सवितानंद!! !!श्री स्वामी सवितानंद!!!
हे नाम जरी मुखी आले तरी लगेच डोळ्यासमोर उभी राहते ती स्वामी माउली. माउलीचे आपल्या भक्तावर…आपल्या लेकरावर किती माया आहे हे तिच्या डोळ्यातूनच कळते….तिचे प्रेम,तिची माया, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला ती आपल्या पाठीशी आहे ह्यातच ह्या जन्माचे सार्थक आहे……हे आयुष्य आपल्याला का मिळाले ह्याचे उत्तर इथेच सापडते……जो स्वामिनामाचा महिमा जाणतो,ज्याने हे अनुभवले आहे त्यालाच हे बोल पटतील…..
स्वामीजींनी आपल्या भक्तांना दिलासा दिला आहे.त्यामुळेच का कोण जाणे स्वामी भक्त सदैव निर्भय असतात.माणसाचे जीवन म्हटले तर सुखः अथवा दुखः हे येणारच…जे काही घडत आहे ते स्वामींच्या इच्छेने घडत आहे असा विश्वास ठेऊन त्याचा स्वीकार केला तर आयुष्य अतिशय सुंदर होईल.स्वामीचरणी श्रद्धा ठेऊन आपले सर्वस्व त्या माऊली कडे सोपवावे….आपल्या कर्मानुसार आपल्यावर संकटे येणारच पण स्वामींच्या नित्य नामस्मरणाने ती सौम्य होतात. संकटात असताना स्वामिसेवा केलीत तर संकटविमोचन होते…..पण सुखात असताना स्वामींचे नाम घेतलेत तर स्वामी आपल्या भक्तां पर्यंत संकटे येउच देत नाहीत…..ते आपला सांभाळ करतात . आजच्या कलियुगात तर माणसाचे जीवन तर बऱ्याच आधी व्याधी ,अशांती ने ग्रासले आहे……म्हणूनच  प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्थैर्य ,शांती,समाधान मिळवण्यासाठी आपले भरकटणारे मन स्वमिनामामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे.आपण स्वमिनामामध्ये गुंतून राहिलात तर सर्व चिंतांना जिंकू शकता….स्वमिनामामुळे आपल्याला सुखः दुखः ह्याचा विसर पडतो……कशाची चिंता करायची आणि कशाची नाही हे कळायला लागते. आपण जीवनाचे सारथी आहात .आपण आपल्या शिष्याचे जीवन मार्गी लावतात.आणि आमचे हे परमभाग्य कि ह्या जन्मातआपण लाभले ….”स्वामीजी  माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तुमचा आहे….तुमच्या  इच्छेने माझे जीवन जाऊदे…आपल्या  चरणांची धूळ सदैव माझ्या मस्तकी लागुदे आपली  कृपा अखंड असुदे….अखेरच्या श्वासापर्यंत तुझे नाम मुखात असुदे हीच तुझ्या चरणी ह्या लेकराची प्रार्थना ” .
श्रीगुरु सारिखा असता पाठिराखा। इतरांचा लेखा कोण करी ।।
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों। आता उद्धरलो गुरुकृपे।।

गुरू स्वत्वाची जाण
गुरू श्रध्देचे स्थान
गुरू असे महान
सकल जगी II
गुरू कैवल्य चांदण
गुरू मुक्तीचे साधन
गुरू जीवन सांधणं
जाणताहे II
गुरू सामर्थ्य चित्ती
गुरू तेजाची प्रचिती
गुरू चैतन्याची सृष्टी
निर्मिताहे II
गुरूवाणी साखर
गुरू मायेची पाखर
गुरू ज्ञानाचा सागर
अथांग आहे II
एकलव्याची शिष्यता
तीरकमानी एकाग्रता
त्याची गुरूठायी आस्था
ज्ञात आहे II
गुरूविण नाही भेद
गुरूविण नाही बोध
गुरूविण नाही शोध
ईश्वराचा II
ऐसी गुरूंचिये लक्षणे
पुन्हा न लगे सांगणे
म्हणोनि गुरूंचिये चरणे
लोटांगण II


हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ||
विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोड़ी ||
माझी सर्व जोड़ी , हेची माझी सर्व जोड़ी ||
न लगे मुक्ती आणि संपदा II संत संग देई सदा ||
गुरूविषयी जेवढे बोलू तेवढे थोडे असते. गुरू फक्त आणि फक्त प्रेमाची मूर्ती असते.
गुरुकृपा हि केवलं शिष्यस्य परं मंगलम्। 

स्वामीजी मी इथे स्वामी समर्थांचा तारक मंत्र देतोय कारण आपणही स्वामी आहात आणि हाच मंत्र आपला हि आहे

नि:शंक होई रे मना, निर्भय होई रे मना |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना |
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी |
अशक्य हे शक्य करतील स्वामी ||
जिथे स्वामी चरण, तिथे न्यून काय |
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय |
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकी ही ना भीती तयाला ||
उगाची भितोसी भय हे पळू दे |
वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे |
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा |
नको घाबरू तू असे बाल त्यांचा ||
खरा होई जागा श्रेद्धे सहीत |
कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त |
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ |
नको डगमगू स्वामी देतील हात ||
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ |
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
घे तीर्थ घेई, आठवी रे प्रचीती |
न सोडिती तया, जया स्वामी घेती हाती ||
अशक्य हे शक्य करतील स्वामी ||
|| श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||

॥ हरि: ॐ तत् सत् ॥