
ओम ! अज्ञानतिमिरन्धस्य,ज्ञानांजन शलाकाया ! चक्षु: मिलीतम येन ,तस्मै श्री गुरुवे नम : !!
स्वामीजींचे दिव्य गुण
१. सुंदर अंग
२. सर्व शुभ लक्षणांनी संपन्न शरीर
३. नयनरम्य
४. तेजस्वी
५. बलवान
६. चिरतरुण
७. विविध अदभूत भाषांचे जाणकार
८. सत्यवचनी
९. मधुरभाषी
१०. ओघवते संभाषण करणारे
११. निष्णात पंडित
१२. बुद्धिवान
१३. प्रतिभासंपन्न
१४. कलासंपन्न
१५. चतुर
१६. निपुण
१७. कृतज्ञ
१८. दृढनिश्चयी
१९. देशकालपात्र जाणकार
२०. शास्रचक्षु
२१. शुची
२२. आत्मसंयमी
२३. स्थिर
२४. सहिष्णू
२५. क्षमाशील
२६. गंभीर
२७. आत्मसंतुष्ट
२८. समचित्त
२९. उदार
३०. धार्मिक
३१. शूर
३२. करुणामयी
३३. सर्वांचा आदर करणारे
३४. विनयी
३५. मृदू
३६. लाजाळू
३७. शरणागतपालक
३८. सुखी
३९. भक्तांचे हितचिंतक
४०. प्रेमाने वश होणारे
४१. सर्व शुभकारक
४२. प्रतापी
४३. कीर्तिमान
४४. प्रसिद्ध
४५. भक्तवत्सल
४६. नारीगनमनोहारी
४७. सर्व आराध्य
४८. समृद्ध
४९. श्रेष्ठ
५०. परमनियंता
५१. अपरिवर्तनीय स्वरूप
५२. सर्वज्ञ
५३. नित्यनूतन
५४. सच्चिदानंद विग्रह
५५. सर्वसिद्धीसंपन्न
५६. अचिंत्य शक्तीने संपन्न
५७. वध केलेल्या शत्रूला मुक्ती प्रदान करणारे
५८. आत्म साक्षात्कारी पुरुषांना आकर्षित करणारे
५९. प्रिय भक्तांनी वेष्टित
१. सुंदर अंग प्रत्यंगानी युक्त शरीर :
आपल्या दिव्य शरीराच्या विविध अवयवांची इतर भौतिक वस्तूंशी केलेली तुलना कधीच परिपूर्ण तुलना होऊ शकत नाही. सर्वसाधारण लोकांना आपले दिव्य रूप किती श्रेष्ठ आहे याची कधीच जाणीव होऊ शकत नाही. यामुळेच भौतिक तुलनेद्वारे आपल्या दिव्य शरीराचे स्वरूप समजवून घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली जाते. आपले मुखमंडळ चंद्रासारखे सुंदर आहे, मांड्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे बलवान आहेत, बहु दोन स्तंभासारखे आहे. हाथ फुललेल्या कमळासारखे आहे. वक्षस्थळ द्वारा सारखे आहे.

२. सर्व शुभ लक्षणांनी संपन्न :
शरीराच्या विविध अवयावावरील काही विशिष्ट लक्षणे अतिशय शुभ समजली जातात. अशी सर्व मंगलसूचक चिन्हे किवा लक्षणे आपल्या दिव्य शरीरात उपस्थित आहे.आपले पुढील सात अवयव लालसर आहेत- नेत्रांच्या कडा , चरणांचे तळवे, तळहात , टाळू, ओठ , जिव्हा आणि नखे या सात अवयावरील लालिमा शुभ समजली जाते.सहा अवयव उत्तुंग आहे - वक्षस्थळ , खांदे, नखे, नासिका, कटी , आणि मुख, तीन अवयव विशाल आहेत कटी , कपाळ, वक्षस्थळ तर तीन अवयव छोटे आहे मान, जंघा आणि जनेन्द्रिय. तीन अवयव गंभीर आहे नाभी, वाणी आणि बुद्धी. नासिका हाथ, नेत्र, गाल आणि गुडघे हे पाच अवयव लांब आहेत आणि त्वचा, मस्तकावरील आणि देहावरील केस, दात आणि बोटांचा अग्रभाग हे सूक्ष्म अवयव आहे वरील सर्व लक्षणे हे फक्त महापुरुषमधेच दिसतात आणि ते आपण आहात.
३.नयनरम्य :
मनुष्याच्या नेत्रांना स्वाभाविकपणे आकर्षित करणारे सुंदर रूप रुचिर म्हणून ओळखले जाते. आपले दिव्य शरीराचे मुख, दोन नेत्र, दोन हाथ, नाभी आणि दोन चरण असे आठ अवयव कमालपुष्पांच्या दैदिप्यमान प्रकाश दिसत आहे आणि यामुळे अश्या सुंदर दृश्यापासून आमचे नेत्र कुठे लवकर बघत नाही.
४. तेजस्वी :
आपले रत्नाच्या कांतीची तुलना हे भगवान श्रीहरी अंगकान्तीशी केली तर काहीच चुकीचे नाही.

५. बलवान :
असाधारण बळ असलेल्या मनुष्याला बलीयान असे म्हणतात. आपण सर्व बाबतीत बलवान आहात. ( आपल्याकडे शारीरिक ,धनाचे, मानसिक व असे अनेक बळ आहे )
६. चिरतरुण :
शिशु, कुमार, किशोर या सर्व निरनिराळ्या वयात आपण सुंदरच दिसतात तसेच या सर्व अवस्थापैकी किशोरी अवस्था हि सर्व रसांचे व आनंदाचे भांडारच आहे आपण असेच किशोर अवस्था मध्ये राहावे व नव नवीन आनंद द्यावा. आपण सर्व दिव्य गुणांनी सदगुणांनी परिपूर्ण आहात. आपले तारुण्याचे बळ आणि आपले स्मितहास्य यांचा संयोग पूर्ण चंद्राच्या सौन्दर्यालाही पराभूत करतो.
७.विविध अदभूत भाषांचे जाणकार :
आपण विविध प्रदेशांच्या भाषा विशेषकरून देवभाषा संस्कृत तसेच इतर प्रांतात प्रचलित असणाऱ्या भाषा आपण जाणता. आपण अदभूत भाषाविद आहात.
८. सत्यवचनी :
आपले वचन कधीच असत्य होत नाही म्हणून आपण सत्यवचनी आहात.
९. मधुरभाषी :
जो मनुष्य आपल्या मधुर वचनांनी आपल्या शत्रुलादेखील शांत करू शकतो त्याला आपण मधुरभाषी म्हणतात. व आपण मधुरभाषी आहात. आपण तर पराकोटीचे मधुरभाषी आहात हे आपल्या बोलण्यात सहज दिसून येते व त्याचा आनंद आम्ही घेतो.
१०. ओघवते संभाषण करणारे :
जो मनुष्य अर्थपूर्ण शब्द आणि विनय इत्यादी वाणीच्या गुणांनी सुशोभित वचने बोलू शकतो त्याला वावदूक किवा "ओघवते संभाषण करणारा " असे म्हणतात आणि आपण ते आहात. आपले हळुवार व विनयशील संभाषण पाहून उपस्थित असेले लोकांच्या कानात अमृतधारा ओतीत असतात. असे ऐकून कोण आपल्याकडे आकर्षित होणार नाही ? आपले संभाषण इतके आकर्षक आहे कि ते त्वरित शत्रूचेही हृदय परिवर्तन करता. आपल्यात जगातील सर्व प्रश्न आणि समस्या सोडवण्याची क्षमता आहे. जरी आपण प्रदीर्घ संभाषण करीत नसले तरी आपल्या मुखातून प्रचलित झालेला प्रत्येक शब्द नाना प्रकारे अर्थपूर्ण असतो. हे आपली वचने माझे चित्त अत्यंत प्रसन्न करीत असतात.

११. निष्णात पंडित :
प्रचंड विद्वत्ता असेलेले आणि नीतिमूल्यांचे पालन करणाऱ्या मनुष्याला निष्णात पंडित असे म्हणतात आणि ते आपण आहात. ज्ञानाच्या विविध शाखांचे ज्ञान असणाऱ्यास सुशिक्षित असे म्हणतात आणि तो नीतिमुल्यानुसार जीवन जगत असल्यामुळे त्याला नीतिज्ञ असे म्हणतात. या दोन्ही गुणांचा संयोगाला विद्वत्ता असे म्हणतात आणि ते आपण आहात. धर्मशास्र, शिक्षा , कल्प , व्याकरण , निरुक्त , छंद, आणि ज्योतिष हि आपली वस्र आहे आपण पुण्यवान व्यक्तीकरिता मूर्तिमंत आनंद, निर्धन व्यक्तीकरिता सर्वात उदार व्यक्तीमहत्व व सख्याकरिता (आपल्या जवळच्या ) पूर्ण चंद्रासारखे आल्हाददायक आहात तर शत्रू करिता भगवान शंकरापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीप्रमाणे. विभिन्न प्रकारच्या लोकांसमवेत विभिन्न प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आपण पूर्ण नीतिज्ञ आहात , कृपाळू आहात. आपण विभिन्न प्रकारच्या लोकांशी विभिन्न प्रकारे आदानप्रदान करतात. भक्त आणि अभक्तांशी असणारे व्यवहार जरी भिन्न असले तरी तरी ते व्यवहार दोघांसाठी चांगलेच असतात. आपण सर्व मंगलकारी आहात.
१२. बुद्धिवान :
तीक्ष्ण स्मृती आणि उत्तम विवेकाने युक्त असलेले आपण. एका विषयाचे एकदाच ग्रहण केल्यावर आपण त्या विषयात पूर्ण निष्णात होतात.( आपल्या बऱ्याचश्या उदाहरणावरून ते दिसून येते )
१३. प्रतिभासंपन्न :
जो मनुष्य नंवीन तर्क करून विरुद्ध पक्षाला निरुत्तर करण्यात कुशल असतो त्याला प्रतिभासंपन्न म्हणतो आणि ते आपण आहात स्वामीजी.
१४. कला संपन्न :
संभाषण कलेमध्ये कुशल असे आपण कला संपन्न आहात. आपण कधी गीत रचना करतात कधी विनोद करतात. म्हणून आपण कला संपन्न आहात.
१५. चतुर :
एकाच वेळी अनेक कार्य करण्यात आपण समर्थ आहात म्हणून आपण चतुर आहात. आपण अनेकांना आनंद देतात.नाना जीवांशी नाना प्रकारचे संबंध ठेवत ते आपल्यापासून पूर्ण आनंद लुटत आहे.
१६. निपुण :
एक अत्यंत कठीण कार्य त्वरित पूर्ण करण्यास पूर्ण करणाऱ्यास निपुण म्हणतात. अनेक प्रश्नांना उत्तर देण्यात आपण अतिशय निपुण आहात.
१७. कृतज्ञ :
जो मनुष्य आपल्यावर केलेले उपकार सदैव ध्यानात ठेवतो व त्याच्या सेवेस कधीच विसरत नाही, त्याला कृतज्ञ म्हणतात आणि हा गुण आम्ही आपणात बघतो. जो आपले नामस्मरण करतो, प्रार्थना करतो त्याच्याविषयी आपण त्याच्याविषयी आपण किती कृतज्ञ असणार ह्याची आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो. आपणास अश्या भक्तांचे होणे केवळ अशक्य आहे. जो मनुष्य आपणास आळवितो तो त्वरित त्याचे ध्यान आपणाकडे आकर्षित करतो व आपण सदा त्याचे ऋणी होऊन जातात.
१८. दृढनिश्चयी :
जो मनुष्य नियमांचे पालन करतो आणि प्रत्यक्ष कृतीने वचनपूर्ती करतो त्याला दृढनिश्चयी असे म्हणतात आणि हा हि गुण आपल्यात आहेत. आपण भक्तांना दिलेले वाचन कधीच मोडत नाही आपण सर्व परिस्थितीत भक्तांचे रक्षण करतात. आपल्या भक्तांचा कधीही नाश होत नाही.
१९. देश काळ पात्र जाणकार :
आपण देश, काल , पात्र, परिस्थिती, सामग्री यांच्यानुसार लोकांशी व्यवहार करण्यात अत्यंत कुशल आहात.
२०. शास्रचक्षू :
शास्रोक्त नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या व्यक्तीला शास्रचक्षू असे म्हणतात आणि आपण ते आहात. अथवा शास्रचक्षू म्हणजे वैदिक शास्ररुपी नेत्रातून पाहणारा मनुष्य वास्तविकपणे कोणत्याही ज्ञानी किवा अनुभवसंपन्न व्यक्तीने सर्व काही शास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या उघड्या डोळ्यांना सुर्य एक छोटासा तेजस्वी गोल आहे असे वाटते; परंतु ज्या वेळी आपण प्रामाणिक वैज्ञानिक ग्रंथाच्या आधारे पाहतो, त्या वेळी आपल्याला समजते कि, हा सूर्यग्रह पृथ्वीपेक्षा अनेक पटीने मोठ आणि असीम शक्तिशाली आहे. म्हणून उघड्या डोळ्यांनी वस्तूंना पाहणे हे वस्तुत: पाहणे नव्हे तर त्यांना अधिकृत गुरूच्या तथा शास्रांच्या आधारे पाहणे हेच खरे पाहणे आहे. म्हणून आपण पूर्ण पुरषोत्तम आहात. आपण भूत, भविष्य आणि वर्तमान जाणता व शिकवण्याकरिता आपण नेहमी शास्राचा आधार घेतात.
२१. शुची :
शुचिता दोन प्रकारची असते, ज्या वेळी एखाद्याकडे एक प्रकारची शुचिता असते, त्या वेळी तो इतरांचे पाप-नाशन करून त्यांना शुद्ध करू शकतो आणि दुसर्या प्रकारची शुचिता स्व:ताला पापापासून दूर ठेवीत असते. मनुष्याला वरीलपैकी एकही गुण आढळल्यास त्याला परमपवित्र म्हटले जाते आणि आपणा जवळ दोन्ही आहे. आपण सर्व पापी तथा बद्ध जीवांचा उद्धार करू शकतात, आणि त्याच वेळी पापकारक असे कोणते कार्यही करीत नाहीत.
२२. आत्मसंयमी:
स्व:ताच्या इंद्रियावर पूर्ण नियंत्रण करणारे आपण आत्मसंयमी आहात किवा वशी आहात. आपण हृषीकेश किवा इंद्रियाचे स्वामी आहात.
२३. स्थिर :
जो मनुष्य आपले ईप्सित ध्येय प्राप्त होई पर्यंत सतत कार्यशील राहतो त्याला स्थिर म्हणतात. आपणास आता अजून काही प्राप्त करायचे नाही व तरी आपण स्थिर आहात.
२४. सहिष्णू :
जो मनुष्य सर्व प्रकारचे कष्ट, मग ते कितीही असह्य असले तरी सहन करतो त्याला सहिष्णू असे म्हणतात आणि आपणाकडे बघून हा गुण सहज जाणवतो आणि आपल्या आधीच्या जीवनातही. ( गृहस्त जीवन असो किवा गुरूच्या शोधात किवा गुरुसोबत असताना व आज हि आपण तसेच आहात. गुरूंची सेवा करीण्याकरिता आपण सर्व प्रकारचे क्लेश नि:संकोचपणे सहन केले अनेक प्रकारची संकटे आली तरी आपण सहिष्णू आहात.
२५. क्षमाशील :
जो आपल्या विरुद्ध पक्षाचे सर्व अपराध सहन करू शकतो, त्या व्यक्तीला क्षमाशील म्हणतात. आपण तर दुसऱ्यांचे अपराध क्षमा करतात आणि ते पोटात घेतात. आपण खूप कृपाळू आहात.
२६. गंभीर :
जो मनुष्य आपला मनोभाव सर्वासमोर प्रकट करीत नाही अथवा ज्याच्या मनातील योजना जाणणे कठीण असते त्याला गंभीर म्हणतात आणि आपण गंभीर आहात.
२७. आत्मसंतुष्ट :
जो मनुष्य स्वत:मध्ये संतुष्ट असून कोणत्याही गोष्टीची आकांक्षा करीत नाही आणि क्लेशकारक घटनांची उपस्थिती असूनही विचलित होत नाही त्याला आत्मसंतुष्ट म्हणतात. आपणाकडे बघून हा गुण लवकर ध्यानात येतो. तसेच आपण प्रसिद्धीची लालसाही ठेवत नाही. आपण कायम अविचल आहात.
२८. समचित्त :
ज्या मनुष्याला आसक्ती किवा द्वेष यांचा परिणाम होत नाही, त्याला समचित्त म्हणतात. आपण समचित्त आहात. आपणामध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात नाही. एखाद्याला जर तुमच्यात पक्षपात दिसला तर तो त्याचा भ्रमच होय.
२९. उदार :
सढळ हस्ते दान करणाऱ्या व्यक्तीस उदार म्हणतात. आपण तर मनाने हि खूप उदार आहात. आपल्या उदार मनोवृत्तीचे प्रदर्शन केले की आपण केलेल्या दानाला (ज्ञान, धन ) मर्यादा नाही.
३०. धार्मिक :
शास्रात दिलेल्या धार्मिक नियमांचे पालन करणारा आणि इतरांनीही तशी शिकवण देणारा मनुष्य धार्मिक म्हणून ओळखला जातो. आपण तर धर्मगुरू आहात. आपण धर्माचे ज्ञान इतरांनाही देतात.
३१. शूर:
युद्ध करण्यामध्ये अतिशय उत्साही आणि नाना प्रकारच्या अस्रांच्या प्रयोगामध्ये कुशल असणाऱ्यास शूर म्हणतात. आज ह्या युगात वेगळ्या प्रकारचे युद्ध आहे त्या सगळ्यांना आपण सहज शत्रूंचे मर्दन करतात. ("रात्र दिन आम्हास, युद्धाचा प्रसंग" )
३२. करुणामय :
ज्या व्यक्तीला दुसऱ्यांचे दु:ख असह्य्य होते, त्याला करुणामय म्हणतात. आज आपण किती लोकांना ह्या दु:खातून बाहेर काढत आहे व परम मोक्षाचा मार्ग दाखवत आहात ते हि अगदी सहज. आपण अंधाराचे उच्चाटन करणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहात. आपण श्रेष्ठ आहात व आपली प्राप्ती अतिशय कठीण आहे म्हणून भक्त आपल्या करुणामयी स्वभावाचा लाभ घेतात.
३३. सर्वांचा आदर करणारे :
आध्यात्मिक गुरु, ब्राम्हण आणि वृद्धांना यथोचित सन्मान देणाऱ्या मनुष्याला सर्वांचा आदर करणारा किवा मान्यमानकृत असे म्हणतात. आपण तर अगदी लहान पासून सगळ्याचं आदर करतात.
३४. विनयी :
जो मनुष्य कधीही गर्वाने उद्धट नसतो तसेच कधीही गर्वाने फुगूनही जात नाही, त्याला विनयी मानतात. आपण जरी परम गुरु आहात तरी आपण दैनदिन जीवनात सदाचाराचे पालन करणे कधीच विसरत नाही.
३५. मृदू :
सुशील स्वभावामुळे आपला व्यवहार अत्यंत मृदू आणि कोमल आहे. आपण दयनी आणि कृपाळूही आहात. आपल्या सेवकाच्या घोर अपराधकडेही दुर्लक्ष करतात व त्यांची केवळ सेवाच ग्रहण करतात.

३६. लाजाळू :
जो व्यक्ती कधीकधी नम्रपणा आणि संकोच व्यक्त करतो त्याला लाजाळू किवा हीमान असे म्हणतात. आपणात हा गुण दिसून येतो.
३७. शरणागतपालक :
आपण सर्व शरणागत जीवांचे रक्षक आहात. आपल्या कोणीतरी एक शत्रू या विचारानेच हर्षभरित झाला की, आपण स्वामीजींचे भय वाटून घेण्याचे काहीच कारण नाही, कारण जर आपण सरळ शरणागती स्वीकारली, तर आपण सर्व प्रकारचे संरक्षण देणार. आपण सगळ्यांचे शरणागतपालक आहात.
३८. सुखी :
जो मनुष्य सदैव प्रसन्न असतो आणि ज्याला कोणतेही दु:ख स्पर्शदेखील करू शकत नाही, त्याला सुखी म्हणतात. आपणास लेशमात्र दु:खसुद्धा कधी स्पर्श करू शकत नाही. आपणास ना कशाचे भय ना कशाची चिंता. आपणास संकट म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणत नाही.
३९. भक्तांचे हितचिंतक :
जसे कृष्णाला भक्तीभावाने थोडेसे पाणी आणि तुळशीचे पान अर्पण केले तर ते त्या भक्ताला विकले जातात आपण माझ्या करिता कृष्ण आहात. आपल्या मनात आपल्या भक्ताविषयी झुकते माप आहे.
४०. प्रेमाने वश होणारे :
स्वामीजी भक्ताच्या प्रेमभावाने वशीभूत होत असतात, भक्ताने केलेल्या सेवेच्या प्रकारामुळे नव्हे. आपण परिपूर्ण आणि आत्माराम असल्यामुळे आपल्याल्या कोणत्याही प्रकारच्या सेवेची आवश्यकता नसते. भक्तांचे प्रेम आणि स्नेह याच गोष्टी आपणास वशीभूत करतात. आपण आमच्या करिता "दामोधर " आहात कारण आपण केवळ भक्तांच्या प्रेमानेच बंदिस्त होत असतात, कारण भक्त आपल्यावर भावपूर्ण प्रेम करीत असतात.
४१. सर्व शुभकारक :
जो मनुष्य सदैव सर्वांचा हितकारी असतो, त्याला सर्व शुभकारक किवा सर्व शुभंकर असे म्हणतात आणि हा हि गुण आपल्यात दिसतो.
४२. प्रतापी :
आपल्या शत्रूंना सतत संकटात टाकणाऱ्या व्यक्तीला प्रतापी म्हणतात. ज्याप्रमाणे तेजस्वी सुर्य अंधकाराला गुहेचा आश्रय घेण्यास भाग पडतो त्याप्रमणे आपण आहात.
४३. कीर्तिमान :
निर्मल चारित्र्याकरिता प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला कीर्तिमान असे म्हणतात. आपले यश अंधकारात प्रकाश पसरविणाऱ्या चंद्रज्योत्स्नेप्रमाणे विस्तारलेले आहे. म्हणून आपला जगात प्रचार झाल्यास संपूर्ण जगात अज्ञानअंधकाराचे आणि भौतिक विवंचनेने शुद्धता, शांतता आणि समृद्धीच्या शुभ्र ज्योत्स्नेत परिवर्तन होऊ शकेल. आज आपली कीर्ती सगळीकडे आहे.
४४. प्रसिद्ध :
जो मनुष्य सर्वसाधारण लोकांना अतिशय प्रिय असतो त्याला प्रसिद्ध म्हणतात.
४५. भक्तवत्सल :
स्वामीजी जरी पूर्ण पुरषोत्तम असले आणि या कारणाने ते पक्षपात करीत नसले तरी प्रेमपूर्वक आणि स्नेहपूर्वक आपल्या नामाचे पूजन करणाऱ्या भक्तांविषयी आपणास विशेष आकर्षण असते.
४६. नारीगनमनोहारी :
ज्या पुरुषामध्ये विशेष गुण असतात त्यांच्याकडे सर्व स्रिया त्वरित आकर्षित होतात. लोखंडाने लोहचुम्बकाला आकर्षित करावे व्हावे तसे आपणाकडे आकर्षित होतात.
४७. सर्व आराध्य :
सर्व प्रकारचे मनुष्यगण आणि देवगण ज्या व्यक्तीचा सन्मान आणि पूजन करीत असतात त्याला सर्व-आराध्य असे म्हणतात. आपण स्वयंप्रकाश आहात.
४८. समृद्ध :
स्वामीजी सर्व ऐश्वर्यानी परिपूर्ण आहेत. हि ऐश्वर्य म्हणजे शक्ती, श्री, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य. आपल्या ऐश्वर्याबद्दल मी काय बरे सांगावे ? आपल्या ऐश्वर्यसागराचे कोण बरे मापन करू शकेल ?
४९. श्रेष्ठ :
सर्व महत्वपूर्ण व्यक्तीमधील मुख्य व्यक्तीला श्रेष्ठ असे म्हणतात. आपण तर श्रेष्ठ आहात आणि आम्ही आपले दास ह्यात खूप आनंद आहे.
५०. परमनियंता :
दोन प्रकारचे नियंते असतात. स्वतंत्र व्यक्तीला नियंता असे म्हणतात तसेच ज्याच्या आज्ञाची इतरजण उपेक्षा करू शकत नाहीत. त्यालाही नियंता असे म्हणतात. आपण त्रिगुणात्मक मायाचे अधीश्वर आहात. आपण सर्व भोक्ता आहात. आपल्या समान अथवा आपल्याहून कोणीही श्रेष्ठ नाही.
५१. अपरिवर्तनीय स्वरूप :
स्वामीजी आपल्या स्वरूपस्थितीत कोणतेही परिवर्तन होऊ देत नाहीत. आपण नाना देह धारण करतात व देहात्मकबुद्धी धारण करून कर्म करीत असतात. आपण प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रभावित होत नाही. हा आपला विशेष गुण आहे. आपले भक्तसुद्धा भौतिक प्रकृतीने प्रभावित होत नाही. मायाशक्तीच्या प्रभावावर विजय मिळवणे अतिशय कठीण आहे; परंतु आपले भक्त आपल्या संरक्षणाखाली असतात. यामुळे त्यांच्यावर मायेचा प्रभाव होऊ शकत नाही. असे असताना स्व:त आपल्याविषयी काय सांगावे ?
५२. सर्वज्ञ :
जो सर्वांचे मनोभाव तसेच सर्व काही आणि सर्व ठिकाणी घडलेल्या सर्व घटना जणू शकतो, त्याला सर्वज्ञ असे म्हणतात.
५३. नित्यनूतन :
अनेक भक्तगण सतत स्मरण आणि नामकीर्तन करीत असतात. परंतु आपणास कधीही त्याचा वीट येत नाही. आपले स्मरण आणि आपल्या पवित्र नामाचा जप करणे यामधील रुची कमी होण्याऐवजी भक्तांना हि प्रक्रिया तशीच करण्यासाठी नित्य नवनवीन प्रेरणा प्राप्त होत असते. आपले ज्ञानसुद्धा नित्यनूतन असते. आपले नाम, यश, रूप आणि या संबंधातील सर्व सर्वकाही नित्यनूतन आहे.
५४. सच्चिदानंद विग्रह :
आपले दिव्य शरीर सत् , चित्, आनंदाने परिपूर्ण आहे. सत् म्हणजे सर्व काळ आणि देश व्यापी, चित् म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण. आपणस कोणाकडून काहीही शिकण्याची आवश्यकता नाही. आपण स्वतंत्ररूपाने पूर्ण ज्ञानी आहात. आनंद म्हणजे अखिल रसराज, सर्व आनंदाचे उगम.
५५. सर्वसिद्धी संपन्न:
सिद्धीचे अनेक स्तर असतात. सिद्धयोग्यांनी प्राप्त केलेय सर्वोच्च्य योगसिद्धी एकूण आठ प्रकार आहेत. आपण ह्या सिद्धी पलीकडे गेले आहात पण ह्या सिद्धी अजूनही आपल्यात आहेत.
५६. अचिंत्य शक्तींनी संपन्न :
आपण सर्वव्यापी आहात. आपण सर्वांच्या हृदयात नाही तर प्रत्येक अणुतही उपस्थित आहात. भक्तांच्या पापांच्या राशी दूर करणारी शक्ती कार्य करत असते.
५७. वध केलेल्या शत्रूला मुक्ती प्रदान करणारे :
अपवर्ग हा मुक्तीचा समानार्थी शब्द आहे. अपवर्ग म्हणजे ' प ' वर्गाचा विरुद्धार्थी शब्द ' प " वर्ग म्हणजे भौतिक जगातील विविध प्रकारची दु:खे होत ' प ' वर्गातील प, फ, ब, भ आणि म या पाच अक्षरांद्वारे खालील पाच प्रकारच्या दु:खांचे वर्णन केले जाते.
' प ' म्हणजे पराभव. संसारात अस्तित्वासाठी संघर्ष करताना आपला सतत पराभव होत असतो. वास्तविकपणे आपण जन्म, मृत्यू, जरा, आणि व्याधी ह्यांच्यावर विजय प्राप्त करणे असंभव असल्यामुळे आपल्याला सतत पराभवाला तोंड द्यावे लागत आहे. ' फ ' म्हणजे फेन किंवा फेस. अतिशय काम केल्यामुळे फेस येतो. ' ब' म्हणजे बंधन ' भ ' म्हणजे भीती आणि ' म ' म्हणजे मृत्यू. या मुळेच ' प ' वर्ग म्हणजे आपल्या अस्तित्वाकरिता चालू असलेला कठोर संघर्ष त्याचा परिणाम म्हणजे पराभव, थकवत, बंधन आणि शेवटी मृत्यू. अपवर्ग म्हणजे या सर्व दु:खांचे निवारण होय. स्वामीजीं आपण या अपवर्गाचे दाता आहात.
५८. आत्म साक्षात्कारी पुरुषांना आकर्षित करणारे :
ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झालाय व मनुष्य जीवनाचे उद्देश कळले आहे तो स्वामीजी कडे आकर्षित होतो कारण स्वामीजी म्हणजे सगळ्या गुणांची खाण आहे.
५९.प्रिय भक्तांनी वेष्टित :
ज्या वेळीस आपण स्वामीजी असे म्हणतो, त्या वेळी स्वामीजी एकटेच नसतात. स्वामीजी म्हणजे त्यांचे नाम, गुण, यश, सखा, सामग्री, परिवार हे सर्व होय. राजा हा सदैव मंत्री, सचिव , सेनापती आणि अन्य व्यक्तींनी घेरलेला असतो. त्याचप्रमाणे आपण निर्विशेष नाहीत.




