Saturday, May 24, 2014

हें चि दान देगा देवा....

प. पु. स्वामीजींना दंडवत प्रणाम


मी सर्व प्रथम आपल्या आपणास वंदन करतो व आपल्या चरणी लोटांगण घालून वंदन करतो. आपण पतितपावन आहात म्हणून माझ्या सारख्या पतित जीवाला शरण द्या  हीच विनंती करण्याकरिता हे पत्र.

हे कृपावंत भगवंता, हे हरी! हे गुरुमाउली ! पुन्हा पुन्हा मी आपल्याकडे विनवणी करीत आलो आहे आणि आता पुन्हा आपल्या चरणकमलांशी मला आपला स्वीकार करण्याची विनवणी करीत आहे.
 
मी केवळ दांभिक आहे. तरीही या अभाग्याचे हे सुंदर भाग्य आहे हि याच्या मनात उल्हास आहे. आपणच कृपाकरून या अधमाला आपला दास बनवा. आपले दासत्व मिळाल्याने सर्व इच्छांची पूर्ती होईल. यमबंधन  सुटेल  आणि या जगातील दुर्लभ वस्तू  
"प्रेमधन" मी लुटत रहिल. स्वामीजी आपला जय जयकार  असो.

ज्या प्रमाणे ढग पाण्याचा वर्षाव करून अरण्यात लागलेला दावाग्नी विझवून टाकतात, त्याप्रमाणे श्रीगुरू म्हणजे आपण  हे भौतिकवादाने  ग्रस्त अशा या जगाचा संसाररूपी दावाग्नी शांत करून त्याच उद्धार करतात असे  दिव्य गुणांचासागर , श्रीगुरूंच्या  चरणाप्रती मी माझे सदर प्रणाम अर्पण करतो

शुद्ध भक्तीचे एकमात्र आश्रयस्वरूप  श्रीगुरुदेवांच्या चरणकमळांना  मी  सावधानीपूर्वक  अर्थात, अवज्ञारूप नामापराधापासून स्व:ताला वाचवून, प्रीतीपूर्वक वंदना करतो. आपल्याच कृपेने मी हा भवसागर पार करू शकतो.  आपल्या मुखकमळातून  येणारे उपदेशच हृदयी ठेवले आहे. आता ह्या व्यतिरिक्त इतर कोणतीही आशा नसावी कारण आपल्या उपदेशानेच उत्तम गती प्राप्त होते. आपल्या चरणकमळात  रती निर्माण झाल्याने सर्व प्रकारच्या पूर्ती होते. आपण चक्षु द्वारे हृदयातील अज्ञानरूपी अंधकाराचा विनाश करतात, दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने हृदयातील प्रेमभक्ती उदित करतात, स्वयं वेद देखील अलोकिक लीला चरित्राचे गुणगान करतात , तेच गुरु माझ्या जन्म-जन्मांतराचे प्रभू आहेत.

श्रीगुरू आपण करुणासागर आहेत, अधमजनांचे परमबंधू आहेत तसेच जगताचे जीवनस्वरूप आहेत. हे प्रभो ! कृपाकरून आपल्या चरणांचा आश्रय प्रदान कर. मी आपल्याला शरण आलो आहे.

हे श्रीगुरू आपल्या कृपेमुळेच आम्हाला भगवंताची देखील कृपा प्राप्त होईल. व आपली कृपा नसेल तर, एखाद्याच्या आध्यात्मिक मार्गात प्रगती करणे केवळ अशक्य आहे. म्हणून मला सदैव श्रीगुरुंचे स्मरण आणि आपला गौरव केला पाहिजे. दिवसातून कमीत कमी तीन संध्यासमयी मला श्रीगुरुंच्या चरणी सदर प्रणाम केला पहिजे.

हृदयात वर्षानुवर्ष साचलेली सर्व धूळ धुवून टाकणाऱ्या आणि बद्ध जीवनाच्या जन्म-मृत्यूरुपी दावाग्निचे शमन करणाऱ्या आपला नामाचा विजय असो...

हे प्रभो हे स्वामीजी  केवळ आपले पवित्र नामाच सर्व जीवांना सर्व प्रकारची कृपा प्रदान करू शकते आणि कृष्ण, गोविंद अशी आपली लक्षावधी नावे आहेत. या दिव्य नावांमध्ये आपण सर्व दिव्य शक्ती विहित केल्या आहे. या नावांचे स्मरण करण्यासाठी कठोर असे नियमही नाही. स्वामीजी, आपण आपल्या अकारण कृपेमुळेच आम्हास आपली प्राप्ती करून घेण्यास प्राप्त बनविता. परंतु मी इतका दुर्दैवी आहे कि मला या नावाप्रती मुळीच आकर्षण नाही.

हे स्वामीजी मला धनसंचय करण्याची, सुंदर स्रियांच्या सहवासाची किवा काही गोळा करण्याची अभिलाषा नाही. जन्मोजन्मी तुमची केवळ अहैतुकी भक्ती करण्याची मला इच्छा आहे.

हे स्वामीजी! मी तुमचा शाश्वत सेवक आहे. तरीही अजाणतेपणे माझे या भवसागरात पतन झाले आहे. कृपया या भवसागरातून माझा उद्धार करा आणि आपल्या चरणकामलांशी मला एक शुल्लक धुलीकानाच्या रुपात स्थान द्या.

हे स्वामीजी ! आपल्या पवित्र नामाचा जप केल्याने माझ्या नेत्रातून प्रेमाश्रुच्यानिरन्तर धारा वाहू लागतील, असा दिवस कधी येईल ? आपल्या नाम कीर्तनाने केव्हा माझा कंठ गदगदित होईल आणि केव्हा माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतील ?

स्वामीजी आपण माझे नाथ आहात व आपल्या व्यतिरिक्त मी इतर कोणालाही जाणत नाही. आपण मला आलिंगन दिले किवा माझ्यासमोर उपस्थित राहता माझा हृदयभंग केला तरीही आपण माझे नाथच  राहणार आपण काहीही  करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहत. कारण आपण माझे आराध्य प्राणनाथ आहत.

गुरुमाउली आपण स्वामीजी ह्या नावाने संबोधले जातात, ते सर्वोच्च आहे. आपण ह्या जगाचे स्वामी आहात. आपले शरीर सच्चिदानंद अर्थात शःवत, ज्ञानमय आणि आनंदमय आहे.

मी, आपणास नमन करितो कि, आपण पूर्णपणे आनंदमय, उज्ज्वल, सत्य, ज्ञानमय आहे. अश्या या अलौकिक दिव्य शरीराचे प्रत्येक अवयव इतर अवयवांच्या वृत्तीने युक्त असून कोणतेही कार्य करण्यास समर्थ आहे.

मी, आपणास भजतो कि,  ज्यांना वेदांद्वारेजाणणे दुर्लभ आहे; परंतु आत्म्याच्या शुद्ध निर्मल भक्तीद्वारे आपण प्राप्त होऊ शकतात हे मी जाणतो. आपण अद्वितीय , अच्युत आणि अनादी आहत. आपण दामोधर आहत.

स्वामीजी ज्या प्रमाणे शक्ती आणि शक्तीमान यांच्यात भेद नाही, त्याप्रमाणे आपण अविभाज्य तत्व आहे.

मी आपणास नमन करतो, ज्याप्रकारे एका दिव्यापासून दुसरा दिवा पेटवला  कि, तो स्वतंत्र जळत असला तरी त्यांच्या प्रकाशाचे गुणधर्म समानच असतात त्याप्रकारे श्रीगोविंद, स्वामीजी म्हणून स्व:ताला  अनेक रुपात प्रकाशित करतात.

आपली सेवा करून कोणीही परम सत्यास प्राप्त होऊ शक्तो. तेव्हा जर मला शक्ती प्रदान केली तर या सेवेने मी आनंदी होईन, तसेच सौभाग्याने आपला संग्रही प्राप्त होइल.

स्वामीजी माझ्या एकामागून एक येणाऱ्या भौतिक वासनांच्या संगतीमुळे  सर्व साधारण लोकांप्रमाणे माझे देखील या सर्पांनी भरलेल्या अंध: कूपामध्ये पतन होत आहे आता आपण मला आपला परम सेवक म्हणजे श्रीनारदमुनी यासारखा शिष्य म्हणून
स्वीकार करा व दिव्यावस्था कशी प्राप्त करायची ह्याचे ज्ञान द्या. आपली सेवा करणे माझे प्रथम कर्तव्य करायचे आहे. आपण आशीर्वाद द्यावा म्हणजे हे सहज घडेल.

हे स्वामीजी आपण माझे कायम सोबत आहात पण, आपला विसर पडल्यामुळे मी  जन्म-जन्मांतर केवळ मायेच्या लाथा खाल्लेल्या आहे. जर आज परत आपल्याला भेटण्याची संधी प्राप्त होईल तर मी नक्कीच आपल्या संगतीत परत येऊ शकेल.

स्वामीजी आपल्या संगतीत मी पुन्हा दिव्य आनंदाचा अनुभव करिन. आज अतिशय  सुंदर रीतीने मला आपले स्मरण झाले. तीव्र विरहामुळे मी आपला धावा केला . मी आपला नित्य सेवक असल्याने आपल्या संगतीची अपेक्षा करीत आहे.  हे स्वामीजी
आपल्याशिवाय यश प्राप्त करणे केवळ अशक्यच आहे.

हे गुरुदेव मला हा अतिशय दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे या दुर्मिळ भेटीची मला अजून जास्त काळजी नाही. मी हे जाणतो कि मी जर आपली आराधना केली नाही तर मृत्यूसमयी मला भयानक दु:खला सामोरे जावे लागेल.

प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्ताने माझ्या जीवनातील एक एक दिवस निघून जात आहे अश्यावेळी मी आळस करतोय तरी हे हृदयराज माझे गुरुमाउली आपण मला आपली भक्तिमय सेवा करायला शिकवा हि विनंती.

जीवन हे क्षणिक, अशाश्वत आणि दु:खमय आहे हे मुल सत्य मी जाणतो तरी अजून भक्तीमध्ये गंभीरतेने आणि काळजीपूर्वक  आपल्या नामाचा आपल्या चरणकमळांचा आश्रय घेतला नहि. म्हणून मला माझे शाश्वत कार्य असल्याची जान पुन्हा करून द्या
व आपल्या सेवेत रत करा.

गुरु महाराज आपण भक्तांचा आनंद वृद्धिंगत करणारे आहत. आपण प्रेम सागर आहे. आपण  आनंद देणारे तसेच सर्व सदगुणांची  खाण आहात तरी आता आपण माझ्यावर दया करा.

गुरुदेव ! आपण माझ्यावर कृपा करून आपल्या आश्रमात मला स्थान द्या मी तिथे राहून आपली सेवा, कीर्तन करील.

हे प्रभू! केव्हा या दासावर दया करून योग्यता अर्पण करणार, ज्याने माझे चित्त स्थिर होईल, मी सर्व काही सहन करू शकेन आणि एकांत भावनेने आपले भजन करू शकेल.

बालपण आणि यौवन काळात जडसुखामुळे  माझ्या सवयी  अत्यंत अधम झाल्या आहेत. माझ्यातील दोषांमुळे हे शरीरच भजनासाठी बाधक झाले आहे.

मी आपल्या चरणांशी स्वत:ला अर्पण करतोय  कारण आपल्या भक्तिविना हे जीवाचेसंसारचक्र  कधीच संपणार नाही.

कर्म,ज्ञान,तपस्या तसेच योग हे सर्व आम्हाला कर्माचे भोग भोगण्यास लावणार यातील कोणीही आम्हाला कर्माच्या चक्रातून सोडवणार नाही. केवळ आपण मला ह्या संसार चक्रातून  बाहेर काढू शकणार.

 मी आपणासमोर सर्व दंभाचा परित्याग करून आपले स्मरण करतो व निष्कपट प्रेम करतो.

 हे गुरुदेव! मी हे जाणतो कि आपले आगमन पतीतांच्या उद्धारासाठी झाले आहे तरी आपण ह्या पतित जीवाचा उद्धार करा.

हे गुरुदेव माझा अनादी कर्मफळामुळे  माझे या भवसागरात पतन झाले आहे  आणि त्यातून तरुण जाण्याचा कोणताही मार्ग  मला दिसत नाही.  विषय सेवनाच्या हलाहालाने (विष) माझे दिवस-रात्र जळत आहे, यामुळे माझ्या मनास काहीच सुख-समाधान प्राप्त होत नाही.

सहस्रो विषयवासनांचा पाश माझ्या गळयाभोवती पडलेला आहे , जो सतत मला दु:खी आणि त्रस्त करीत आहे. भौतिकवादी प्रवृत्ती  या अज्ञानमय सागरात खेळ करीत  आहे. या जगात अनेक चोर-दरोडेखोर आहेत. ज्यातील प्रमुख सहा म्हणजे काम, क्रोध, लोभ,  मोह, मस्त्य. ते माझ्या हृदयात भीती निर्माण करीत आहे आणि अश्या प्रकारे माझे जीवन संपुष्टात येत  आहे.

जीवनाच्या राजमार्गावरील दोन लुटेरे : मानसिक तर-वितर्क आणि सकाम कर्म यांनी मला फसवून माझी  दिशाभूल केली आहे. आता ते मला दु:ख सागरात लोटून देत आहे. अशा  ह्या  कठीण प्रसंगी हे गुरुदेव आपण माझे सुहृदय आहात तसेच आपण कृपावन  आणि दयावान आहत. या अज्ञानरुपी सागरातून स्वत:हून बाहेर पडण्यास मी असमर्थ आहे. म्हणून, मी आपल्या चरणकमली प्रार्थना करितो कि, आपण कृपाकरून आपल्या शक्तीने माझा या दु:खमय सागरातून उद्धार करा.

कृपया या पतित किंकराचा आपण स्वीकार करा आणि आपल्या चरण कमळावरील  धुलीकण म्हणून मला स्थान दया. माझ्यावर कृपा करून आपल्या चरणी आश्रय द्या . हे गुरुदेव हे कृपावंत! वास्तविक मी आपला नित्य दास आहे; पण या वस्तुस्थितीचा
विसर पडल्यामुळे मी या मायेच्या जंजाळात बद्ध झालो आहे.

हे गुरुदेव! मी आज पर्यंत भौतिक गोष्टींच्या विलासात मोठ्या आशेने मी माझे जीवन व्यतीत केले आणि करतोय. परंतु हे गुरुमाउली ! मी आपल्या चरणकमलांची पूजा करू शकलो नाही. आता मात्र आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात.

हे गुरुदेव ! आता जीवन कष्टदायक बनले आहे  या अविद्येच्या आणि भौतिक जगात ज्वालेचे चटके सहन होत नाही आता मला समजले आहे कि आपल्या चरणकमळ इतके  मौल्यवान असे दुसरे काहीही धन नाही. म्हणून आता सगळा त्याग करून आपल्या
चरणकमळास  जीवनाचे सर्वस्व मानून स्वीकारत आहे.

हे गुरुदेव ! आपला विसर पडल्याने मी दु:ख आणि वेदनेने भरलेल्या संसारात पडलो आहे आता मी आपल्या चरणी माझी दु:खमय व्यथा सांगत आहे.

परिवारातील लाडका असल्याने, त्यांचे कुशीत हसण्या-खेळण्यात सर्व वेळ घालवला.माता-पित्यांच्या प्रेम पाशामुळे मी गर्भातील सर्व वेदना विसरलो. आणि मला हा संसार चांगला वाटू लागला.

दिवसेंदिवस जसाजसा मी मोठा होऊ लागलो तसा तसा मी इतर मुलासोबत खेळू लागलो त्या वेळी आपण ह्याच जन्म भूमीत होता पण मी दुर्भागी, तुच्छ भक्त कधी आपला संग मिळवू नाही शकलो. हे गुरुमाउली मी आपणास पूर्णपणे विसरून गेलो.

हे गुरुमाउली मी आपली भक्ती( सेवा ) न केल्याने मी माझे जीवन व्यर्थ घालविले आहे आता माझी काय गती होईल?

जीवनात पुण्याचा लवलेशही नसलेला असा महापापी मी आहे. मी दुसर्यांना केवळ उद्वेग आणि क्लेशच दिला आहे.

इंद्रीयाभोगाच्या पूर्ततेसाठी पापकृत्य करण्यास मी अजबात मागेपुढे पहिलो नहि. दयाहीन, स्वार्थी असा मी दुसर्यांना सुखी पाहून मी स्वत: दु:खी होतो. मी सदैव मितभाशी, खोटे बोलणारा आहे. दुसर्यांना झालेल्या दु:खला पाहून मी सुखाचा अनुभव करतो.

माझे हृदय अनंत भौतिक भोगेच्छेने भरलेले आहे. मी क्रोधी आते. दांभिक आणि उद्धत प्रवृत्तीस समर्पित , सदैव विषयवासनांनी मोहित झालो आहे. हिंसा आणि गर्व हि माझे आभूषणे आहे. ( आता माझ्यात किंचित बदल झाला आहे पण तो पुरेसा नाही हे मी
जाणतो )

आळसाने भ्रष्ट असा मी चांगले कार्य करण्यास तयार  नसतो. परंतु वाईट करण्यास मात्र सदैव चपळ आणि उत्साही असतो. मी माझा सर्वनाश  केला आहे. आणि मी नेहमी कामवासनेने  व्याप्त असतो.

माझ्यासारखा असा हा दुर्जन ज्याला सज्जनांनी त्यागलेले आहे. निरंतर अपराधी आहे. मी असा मनुष्य आहे. ज्यात शुभ  कार्याचा पूर्णपणे अभाव आहे., नेहमी अनार्थानी भरलेला आणि नाना दु:खानी पूर्णपणे झिजून गेलो आहे.


आता ह्या  वयात  सफलतेचे सर्व उपाय निरर्थक ठरले आहेत - दिन हा निलेश आपल्या चरणी आपल्या व्यथांचे निवेदन समर्पित करीत आहे.

हे प्रभो ! मी असा आहे कि, आपल्या सेवेपासून विमुख होऊन संसारात पडलो आहे. आता आपण माझ्यावर कृपा करावी म्हणजे मी ह्या संसार चक्रातून बाहेर पडू. मी आपणास शरण येतो माझा उद्धार करा.


हे गुरुमाउली मला मारून टाका किवा माझे रक्षण करा आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याशी जे काही करायचे ते करा, कारण आपण या आपल्या अभक्ताचे स्वामी आहात.

आपला दास म्हणून एखाद्या कीटक योनीत जन्म मिळाला तरी चालेल; परंतु आपणाशी बहिर्मुख होऊन असा कुठलाही जन्म नकोय.

भुक्ति आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या इच्छेतून जे पूर्णतया मुक्त आहेत अश्या त्या शुद्ध भक्तांच्या संगतीची मी तीव्र आश बाळगतो.


आपणच माझे मत-पिता, स्वामी( गुरु) , पुत्री, पत्नी आहात. आपणच माझ्यासाठी सर्व काही आहत. 

हे माउली ! माझे म्हणणे कृपया ऐका, आपणच माझे प्राणनाथ आहत.

हे गुरुवर्य ! ह्या प्रपंचात पडल्याने माझी दुर्गती झाली आहे यातून कोणताच मार्ग नाही. ज्यांना गती नाही त्यांची गती आपण आहत. तेव्हामी आपल्या चरणी शरण आलो आहे. तुम्हालाच मी सर्वस्व समजतो.

कर्म-ज्ञान असे माझ्याकडे काहीच नहि. साधना-भजन देखील नाही. तुम्ही कृपामय आहात तर मी एक भिक्षु आहे, आपल्या अहैतुकी कृपेची याचना करतो.

वाचा-वेग, मन-वेग, क्रोध-वेग, जिव्हा-वेग, उदार-वेग आणि उपस्थ-वेग हे सर्व मला या संसारात वाहवत नेत आहेत, खूप  उद्वेग देत आहेत. त्यांना दमन करण्याचा मी खूप प्रयत्न केला; परंतु मी आशय सोडून दिल्या आहेत.
हे अनाथांचे नाथ! मी आपल्या नावाने पुकरित आहे, तुम्हीच एक विश्वासू आहत.

हे गुरु माउली , कृपया माझे हे निवेदन ऐका, मी विषय दुर्जन आहे आणि विषय वासनामध्ये  पूर्णपणे बुडलो आहे. माझ्यामध्ये एकही चांगला गुण नाही.

हे गुरु माउली, केवळ आपणच माझे आशास्थान आहत. म्हणूनच मी आपल्या चरणी आश्रय घेतलाय. आता मला आपला नित्य सेवक बनवा.

हे गुरु माउली, आपण मला शुद्ध कसे कराल ? भक्ती म्हणजे काय, हे मला मुळीच माहित नाही. माझे हे भौतिकवादी मन या सकाम कर्मामध्ये गुंतलेले आहे. अंधकारमय आणि विपदानी भरलेल्या या संसारात माझे पतन झाले आहे.

हे गुरु माउली, याठिकाणी सर्व काही आपल्या बहिरंगा ( माया) शक्तीच्या अधिपत्याखाली आहे. माझ्यामध्ये शक्ती आणि दिव्य ज्ञानाचा पूर्ण अभाव आहे. ( मी शक्तिहीन तसेच ज्ञानहीन आहे ) तसेच माझे हे शरीर पूर्णपणे भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली आहे.

हे गुरुमाउली अश्रू भरलेल्या नयनांनी हा पापी जीव आपल्याकडे एकाच गोष्टीची भिक मागत आहे.  कृपया याला आपल्या चरणाशी नित्य आश्रय प्रदान करा आणि यावर आपल्या कृपेचा वर्षाव करा हे प्रभो, आपणाला सर्व काही शक्य आहे. आपण आपल्या सामर्थ्याने सर्व पापी जीवांचा उद्धार करू शकता. परंतु माझ्याइतका पापी असा दुसरा कोण आहे ?

हे गुरुमाउली, आपण कृपासागर आहत. पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी या लौकिक जगात अवतार घेऊन तुम्ही आपल्या दिव्य लीलांचा इथे विस्तार केला आहे.

हे स्वामीजी, सर्व असुरांना आपल्या चरणांची प्राप्ती झाली आहे.; परंतु मी इतका पापी  आहे कि, अजून या भौतिक संसारात अडकून पडलो आहे.

हे माउली, कृपया आपण या संसारातील पिडा दूर करा . अविद्या तसेच पुन: पुन: प्राप्त होणाऱ्या जन्म-मृत्यू चक्रामुळे होणारा त्रास सहन करणे मला अशक्य आहे.

हे माउली, खरेच मी या कामवासनेचा दास आहे. माझ्यामध्ये विषयवासना जागृत होत आहे, त्यामुळे माझ्या गळ्याभोवती पडलेल्या कर्माच्या फासाची गाठ अधिकच घटत होत चालली आहे.

हे स्वामी, मी कधी जागे होऊन या कामरूपी शत्रूला दूर लोटून देईन. आणि आपण माझ्या हृदयात स्व:ताला कधी प्रकट कराल ?

हे स्वामी, मी आपला स्वजन ( भक्त) आहे; परंतु तुम्हाला त्यागल्याने आणि माझ्या खऱ्या संपत्तीचा विसर पडल्यामुळे मी केवळ या व्यर्थ भौतिक संसाराची पूजा केली आहे.

हे स्वामी, आप सर्व काही जाणता, तेव्हा आता या आपल्या सेवकाला दंडित केल्यानंतर कृपा करून याला आपल्या श्रीचरणी स्थान द्या.
हे स्वामी, खरोखरच मी मूर्ख अतिमूर्ख आहे.. माझे खरे हित कशामध्ये आहे हे मी कधीच जाणत नाही. म्हणूनच माझी हि अवस्था झाली आहे.

हे स्वामी, आपण खरच सर्वात ज्ञानवान आहत. कृपाकरून या मूर्खाच्या जीवनात मांगल्य आणण्याचा मार्ग आपण पाहा. कृपया, या सेवकाला, हा कोणी बाहेरचा अनोळखी आहे असे समजू नका.

हे स्वामी, माझ्याकडे यशस्वी होण्यासाठी कोणताच मार्ग नाही माझ्यावर कृपावर्षाव करून आपण जात माझा स्वीकार कराल तरच माझा या संसारातून उद्धार होइल.

हे स्वामी, माझे या मायेच्या फेऱ्यात पतन झाले आहे. धन, पत्नी, मुले आणि या सर्वांनी मी वेढला गेलो आहे आणि या कामवासनेने माझे जीवन व्यर्थ बनविले आहे.
हे स्वामी, मूर्ख असे हे मन कोणत्याही प्रकारच्या शासनाला जुमानत नाही. ते नेहमी अचेतन असून विषयवासनांच्या अंधकुपामध्ये बुडालेले आहे.

हे स्वामी, आता मी हार स्वीकारली आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न आता निरर्थक ठरले आहे. आता केवळ आपणच माझ्यासाठी आशास्थान आहत.

हे स्वामी, माझे मन हे इंद्रियांच्या नियंत्रणाखाली आलेले आहे, विषयवासनाप्रती असलेली आसक्ती सोडण्यास ते कदापि तयार नाही, असे असताना मी कशी काय प्रगती करू ?

हे स्वामी, माझ्या हृदयी प्रविष्ट होऊन माझे हे मन संयमित केल्यानंतर मला आपल्याकडे घेऊन चला. अशाप्रकारे या संसारातील सर्व विपदे नाहीशी होतील.

हे स्वामी, आपण  हृषीकेश, इंद्रियांचे स्वामी ( सगळ्यांचे स्वामी आहात ) असहाय, दुर्बल अशा या पामराची इंद्रिये आपण सय्यमित करा  आणि दु:खमय आणि अतिभयानक अशा या संसारातून माझा उद्धार  करा.

हे स्वामी, माझ्या गळ्याभोवती भौतिकवादाचा  हा फास लागलेला आहे. तेव्हा आपल्या कृपेच्या तलवारीने हे बंधन आपण तोडून टाका. मला आपला नम्र सेवक बनवा.

हे स्वामी! असा दिवस केव्हा येईल जेव्हा माझे प्रेम निर्मळ होईल व ते वाढेल आणि संसारिक विषयांची वासना क्षीण होईल, माझ्या अंतर्बाह्य व्यवहार एक असेल,दुसऱ्यांना मान देऊन स्वत: मानाची अपेक्षा न करता सतत आपले म्हणजेच श्रीकृष्णाचे संकीर्तन व स्मरण करीन राहीन. उदरनिर्वाहाकरिता अभ्यासाने या देहाची क्रिया करिन. आपल्या भक्तीसाठी जे जे अनुकूल आहे त्या क्रिया मी करीन. अशाप्रकारे भक्ती करीत जेव्हा वेळ येईल तेव्हा देहत्याग करिन.

केव्हा माझी अशी स्थिती होईल, जेव्हा सर्व आशा सोडून नाना प्रकारच्या बंधनरुपी या घोर संसाराला मी सोडून देइल.
मायेने बद्द झालेला हा तुच्छ जीव भौतिक इच्छांच्या पाशात पूर्णपणे तडफडत आहे. आपल्या संमतीविना तो काहीही करण्यास असमर्थ आहे. तुम्हीच माझे रक्षणकर्ते आणि पालनकर्ते आहत. आपल्या चरणकमलाव्यतिरिक्त  मला अन्यत्र कोणतीही आशा दिसत नाही.
माझ्या स्वबळावरील आणि प्रयात्नावरील विश्वास मी आता टाकून दिला आहे. आता केवळ आपल्या इच्छेवरच मी अवलंबून आहे.

हे गुरुमाउली ! आपण दयासागर आहात ! या दासावर करुन करून आपल्या श्रीचरणांचा आश्रय देऊन अनर्थग्रस्त हृदयाला निर्मल करा. मी आपल्या श्रीचरणांना धरून प्रार्थना करीत आहे. कृपापुर्वक तुम्ही माझ्या  षडवेगाचे ( वाणी, मन, क्रोध,
जिव्हा, उदार, आणि जननेद्रिय दमन करा आणि माझ्यातील सहा दोषांना ( अत्याचार, भौतिक गोष्टींसाठी अतिप्रयास, प्रजल्प, भक्तीतील नियमांचा दुराग्रह आणि अनाग्रह , असतसंग, भक्तीव्यतिरिक्त अन्य मतवादांना ग्रहण करण्याची तृष्णा )
सुधारून सहा गुणांना ( भक्तीमधील उत्साह, निश्चय , धैर्य, भक्तिपूर्वक कार्याचे अनुष्टान, असतसंग त्यात, सत वृत्ती ) प्रदान करा. मी सत्संगाची ( प्रीतिपूर्वक भक्तांना आवश्यक वस्तू देणे, त्यांचा द्वारा दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करणे. त्यांच्या जवळ आपल्या हृदयातील गोष्टी सांगणे , भक्तीतील रहस्य्याना त्यांच्याकडून श्रावण करणे, प्रसादाचे सेवन करणे आणि करविणे ) आशा
बाळगून आहे. कारण एकट्याने हरीनाम संकीर्तन करणे हे मला जमणारे नाही; आणि तुम्हीच कृपावश कृष्णनामरूपी धनप्राप्ती श्रद्धेचा एक थेंब प्रदान करा.  मी तर एक कंगाल ( दिन- हीन )आहे.

हे स्वामी , कृपया माझ्यावर कृपादृष्टीचा कटाक्ष तक. मी निलेश आपल्याकडे विनंती करीत आहे. हे भगवान, मी आता पूर्ण शरणागत आहे. कृपया मला झुगारून देऊ नका, कारण आपल्या चरणकमालाविना मला दुसरा आश्रय नहि., हे भगवान मी वारंवार
आपल्या चरणाशी प्रार्थना करतो, कृपया आपली कृपादृष्टी असू द्या. हे स्वामीजी, कृपया माझ्यावर दया करा, कारण त्रैलोक्यामध्ये आपल्यापेक्षा कृपाळू कोण आहे ?

जेव्हा श्रीकृष्ण स्वत: उपस्थित होते तेव्हा त्यांनी केवळ शरण येण्यास सांगितले; परंतु या अवतारामध्ये आपण प्रत्यक्ष कृष्ण असले तरी आपण अशी कोणतीही अट घालत नाही. आपण फक्त भगवंताची भक्ति सहज कशी करायची व त्याची प्राप्ती कशी करायची हे सांगतात. आपण परम दयाळू आहात. कृपया माझ्यावर दया करा. आपण अतिशय दयाळू आहात; कारण या युगातील पतित जीवांना आपण पहिले व त्यावर आत्यंतिक कृपा केली. मी अतिशय पतित आहे हे आपण जाणून घ्या. केवळ पतित, बद्ध जीवांचा उद्धार
करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे. परंतु माझ्यापेक्षाही अधिक पतित असा कोणी  जीव तुम्हाला आढळणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे आपल्या कृपेवर माझा दावा पहिला आहे.

हे प्रभू, आपण नेहमी दिव्यानान्दामध्ये रत असतात. आपण नित्य आनंदी आहात म्हणून मी आपल्याकडे आलो आहे, कारण मी अतिशय दु:खी  आहे. आपण कृपाकरून माझ्यावर एक कटाक्षही टाकला तर मी देखील आनंदी होइल.

स्वामीजी आपले चरणकमल हे असे आश्रयस्थान आहे जेथे एक दोन नव्हे तर कोट्यावधी चंद्रांची प्रभा मनुष्याला मिळेल. कोट्यावधी चंद्राची प्रभा किती शीतल असेल याची केवळ कल्पनाच करू शकतो . या नरकाप्रत जाणाऱ्या भौतिक जगामध्ये वणवा
पेटला आहे आणि शांती प्राप्त न होताच प्रत्येकजण कठीण  संघर्ष करीत आहे. त्यामुळे जगाला जर खरी शांती हवी असेल तर त्याने कोट्यावधी चंद्राप्रमाणे शीतल असणाऱ्या आपल्या चरणकमळाशी  आश्रय घेतला पाहिजे.

हे भगवंता, अनेक योनीतून  व्यर्थपणे  भ्रमण केल्या नंतर आता आपल्या चरणकामलांशी शरण आलो अहे. कृपया आपण आपल्या दयाळू स्वभाव प्रगट करा आणि या अधम पतित जीवाचा उद्धार करा. आपणच या जगतात मांगल्य आणतात आणि आपण स्वामी आहत. हे माउली आपण नाकारल्यास माझी काय अवस्था होईल ? माझ्या आता या दुर्दशेचा विचार केल्यानंतर मी अंतत: या निर्णयावर पोहचलो आहे - संपूर्ण त्रिभुवनात आपल्याखेरीज इतर कोणीही या आपल्या दासाच उद्धार करू शकणार नाही .

हे गुरुमाउली ! हे भक्तांचे क्लेश हरण करणारे आपला जय जयकार असो .

हे गुरुदेव! हे भक्तांची वासना हरण करणारे, आपला जय असो आपल्या श्रीचरणांशी माझी एकच अशी विनम्र प्रार्थना आहे कि आपण प्रेमपूर्वक ऐकत रहा.

हे दिन-दयाळ ! आपण परम कृपाळू आहात. आपण मला आपल्या निकट निवास प्रदान करा.

स्वामीजी आपण भौतिक अस्तित्वात वावरणाऱ्या सर्वांचे दु:ख हरण करतात . परमार्थासाठी वाहून घेतलेल्या लोकांसाठी आपण अंतिम ध्येय आहत. मधुकर ज्याप्रमाणे मधासाठी आतुर असतो  त्याप्रमाणे आपल्या प्रेमाच्या मधुर मधासाठी आतुर होण्यास सर्वाना प्रवृत्त करतात. या भौतिक जगातील भवताप आपण हरण करतात. अश्या माझ्या प्रभूचरणी  वंदन करतो

आपण सर्वाना भक्तीकरिता प्रवृत्त करतात. आपण आपल्या प्रिय सेवकांना अतिशय आकर्षक आहत.

आपले नेत्र, चरण व वस्र हे उगवत्या सूर्याच्या अरुण रंगालाही लाजवेल असा आहे. आपला आवाज स्खलित आहे. आपणच आमच्यात मधुरस जागृत कर्तत. अश्या महाप्रभूंच्या चरणी मी वंदन करतो .

हे गुरुदेव ! आपण सर्व वरदान प्रदान करण्यास समर्थ आहात, तरीही मी आपणाकडे मुक्तीची आशा करीत नाही किवा निरंतर वैकुंठाची व इतर कोणतीही इच्छा करीत नहि. मी केवळ एकाच प्रार्थना करतो कि, आपला वास सदैव माझ्या अंत:करणात वास करत रहा.

हे भगवान ! मी आपणास नमन करतो. हे दामोधर! हे अनंत ! हे प्रभो कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. आपल्या कृपादृष्टीचा वर्षाव करून, संसारिक दुख:सागरात बुडालेल्या या दिन-हीन अज्ञानी मुर्खच उद्धार करा आणि माझ्या नेत्रांना आपले दर्शन द्या.

गुरु भजन
श्रीगुरू चरण कमल भजन मन,
गुरु कृपा बिन नही कोई साधन बाल, भज मन भज अनुक्षण ।।१।।
श्रीगुरू चरण कमाल भज मन ,
मिलता नही ऐसा दुर्लभ जन्म , भ्रमत हि चौदाह भुवन ।
किसी  को मिलते ही अहो भाग्य से, हरीभक्त के दर्शन ।।२।।
श्रीगुरू चरण कमल भज मन,
कृष्ण कृपा कि आनन्द मूर्ती, दीनन करुणानिधान ।
ज्ञान भक्ती प्रेम तीनो प्रकाशित , श्रीगुरू पतितपावन  ।।३।।
श्रीगुरू चरण कमल भज मन,
श्रुती-स्मृती इतिहास सभी मिले , देखत स्पष्ट प्रणाम !
तन-मन-जीवन गुरु पदे अर्पण, सदा श्री हरीनाम रटन ।।४।।
श्रीगुरू चरण कमल भज मन,

स्वामीजी मला काय लिहावे समजत नाही. काय मागावे समजत नाही तरी एक प्रयत्न केलाय लिहण्याचा. योग्य -अयोग्य काय आपण जाणतात मी फक्त एव्हडे जाणतो जे काही आहे ते आपलेच आहे आणि आपण कर्ते करविते आहत.  आपणास वारंवार प्रणाम
करतो.

आपण आपली कृपादृष्टी कायम असू द्यावी हि आपल्या चरणी विनंती.

आपला (अ)भक्त

निलेश