।। जय गुरुदेव ।।
दिनांक
: २०.११.२०१४
प.पु. स्वामीजीस
दंडवत प्रणाम
स्वामीजी
पत्र लिहण्याचे कारण
ह्या वेळेस जरा
वेगळे आहे. पहिले कारण म्हणजे
आपण पुण्याला आले
पण मला कळाले
नाही थोडे वाईट
वाटले आणि आपण
येणार हे समजण्याचे
काही मार्ग नाही
( आपण कदाचित आम्हास सुतक असल्यामुळे कळवले नसेल पण आमचे आणि काकांचे काही नाती राहिले
नाही मग घरात काही दुखवटा किवा शोकाकुल वातावरण नव्हते मग अश्या परिस्तिथीत आपले दर्शन
मला शक्य होते ). स्वामीजी
मला कसे कळेल
कि आपण पुण्यात
आहात ? ( मला
आपल्या दर्शनाची कायम आस
लागलेगी असते ) मला
आपला पूर्ण सहवास हवा
आहे आपण मला
मार्ग सांगा कारण
ह्या भौतिक बंधनातून
हे सहज शक्य
होत नाही. आपला
सहवास जर लाभला
तर मी आपली
सेवा करेल आणि
माझे मला अजून
ज्ञान मिळेल. आपल्या
अल्प सहवासात मी
खूप काही शिकत
असतो आणि खूप
काही नवीन अनुभवला
मिळते. अगदी छोट्या
छोट्या गोष्टी ज्या आचरणात
आणायला पाहिजे त्या सुद्धा
माहित नव्हत्या आपण
म्हणजे सगळ्यांचे विद्यापीठ. असे
काही नाही कि
आपण ते सांगू
शकत नाही. मला
खूप खूप ज्ञान
अर्जित करायचे आहे पण
ते पुस्तकी नको.
आपण म्हणजे ज्ञानाचे
सागर आहात आणि
आपणच एक असे
आहात कि मला
हवे ते आपण
सहज देऊ शकता
मग ते ज्ञान
असो कि अजून
इतर काही. फक्त एक
गोष्टीची भीती वाटते
ती म्हणजे आपला
राग. अर्थात तो
आमच्या चांगल्या करता असते
हे मी जाणतो
तरी भीती वाटते.
आपण खूप
खूप शिस्त प्रिय
आहात अगदी मिल्ट्रीच्या
कप्तान
असतो तसे पण
मी एक गोष्ट
अनुभवली आपण वरून
किती जरी कडक
स्वभावाचे असले तरी
आतून खूप प्रेमळ
आहात अगदी नारळा
सारखे. आणि खूप
खूप काळजी करणारे
आणि खूप खूप काळजी करणारे. अगदी माहेरी
आलेल्या मुलीची कशी काळजी घेतात तशी आपण आमची आश्रमावर आले कि घेतात आणि आपले प्रेम
आमच्यावर कायम आहे. स्वामीजी असा क्षण
कधी येईल जेव्हा
मी आपणा समोर
निश्चिंत व निवांत
बोलू शकेल ? पण
खुपदा असे होते कि
आपल्या समोर आलो
कि सगळे काही
विसरायला होते असे
का ?
दुसरे कारण म्हणजे
माझ्या सोबत एक
सुखद प्रसंग घडला.
आम्ही सगळे हरिहरेश्वर
ते पुण्याला निघालो
होतो (दिवाळीच्या दिवसात
दि.
२६ ऑक्टोबर ) रात्रीचे
८.३० - ९
वाजले असणार आणि
त्याच दरम्यान मी
आपले नामस्मरण (जप ) करत
होते बहुतेक १८-२० माळा
आपल्या नामाचा जप झाला
आणि गाडी महडच्या ( गणपती
) अलीकडे गाडी खराब
झाली परिसरात जवळ
काहीच नाही आणि
आसपासचे वातावर थोडे भीतीदायक
होते आणि तिथे
रात्री मुक्काम करण्या शिवाय
काही पर्याय नव्हता
आणि अश्या परिस्तिथीत अचानक
एक व्यक्तीने येउन
चौकशी करावी व
पुढे सगळी व्यवस्था
करावी( राहणे, जेवण अगदी
सगळे) रात्री आम्ही
सगळे तिथेच थांबलो
आणि सगळे अगदी
घरच्या सारखे झाले. हे अगदी
माझ्या समजण्याच्या पलीकडचे. थोडक्यात
सांगायचे तर आपल्या
नामाचा महिमा खरच खूप
अगाध आहे. धन्य
झालो जे मला
आपण गुरुरुपात मिळाले.
ह्या नंतर मी
गुरु नाम ( ॐ श्री
स्वामी सवितानंदाय नम:
) जास्त वाढवला. अशीच कृपा
सदैव असू द्या.
तिसरे कारण म्हणजे
मला आठवते कि
माझ्या वागण्यामुळे आई आणि
पप्पांना त्रास झाला होता
आणि ते आपणाकडे
मार्गदर्शनाकरिता आले होते
आणि अगदी त्या
नंतर माझा मोठा
अपघात झाला आणि
एक चांगल्या रस्त्यावर
आलो तो म्हणजे
अध्यात्म. सुरवातीला खूप गोडी
लागली आणि इस्कॉन
मध्ये सुरवात केली
पण आता मला
ह्या मागचे खरे
कारण समजले कि
आपण आधी पासून
माझ्या करता कसा
रस्ता करून ठेवला
होता (सुरवात जरी कष्टदायक झाली तरी आता
खूप छान वाटतंय ). हि गोष्ट मला आता
उमगली म्हणून आपले
धन्यवाद करावे त्या करता
हे पत्र. आपण
जे देत आहात
त्या करता धन्यवाद
हे शब्द खूप
तोकडे वाटतात. धन्य
हो गुरु माउली.
कसे फेडू हे
सगळे उपकार ?
स्वामीजी
आपल्या बद्दल काय लिहू
जे काही आपण
देत आहात ते
सगळेच शाश्वत , नित्य
आणि अमुल्य आहे.
फक्त मला ह्या
नवीन जीवनात कसे
जगायचे ती कला
पण एकदा शिकवा
म्हणजे पुढील मार्ग सुखकर
होइल. आपल्याकडे बघितले कि खूप
शक्ती येते व खूप
सकारात्मक वाटते कारण आपले जीवन चरित्र
मी थोडे समजलो आहे. आपण
किती शक्तिशाली आहात
याचा प्रत्यत येतो.
मी
काय पुण्य केले
असेल माहित नाही
मग मी भाग्यवान
आहे हे नक्की
जे आपण मला गुरुरुपात मिळाले
स्वामीजी
जसे भगवद गीतेत
म्हटले आहे कृष्णानी
जसे म्हटले आहे
कि सतत माझे
स्मरण कर तसे
मी आपले प्रत्येकी
क्षणी स्मरण करतो
खूप कमी वेळ
असेल कि आपले
स्मरण होत नसेल.
मी स्वत:ला
खूप खूप भाग्यवान
समजतो कारण मी
कश्यातच काही नसताना
आपण मला आपले
करावे ह्यावून चांगले
काय असेल ? आज
आपले एव्हडे वरिष्ठ
भक्त असताना मला
आपण जागा दिले
ह्या करता मी
स्वत:ला धन्य
मानतो.
गुरु माउली आपण भक्ती
हि किती साधी
आणि सहज करून
दाखवली आहे आणि
त्यात विज्ञानाची सांगड
घातली खरच हे
अगदी अवघड विषयाला
साधे सोपे केले.
आज पर्यंत भगवंत
आणि त्याची भक्ती
म्हणजे आपणा करता
अशक्य असेच वाटायचे
पण आपणास भेटून
सगळे काही सहज
वाटायला लागले आणि तो
जन्म-जन्माचे नाते
होते ते आता
कळू लागले. आपणा
बद्दल काय लिहावे
आणि ते लिहण्या
योग्य मी तर
नक्कीच नाही पण
लिहल्या शिवाय राहवत नाही.
हे माउली आपल्या व्यतिरिक्त
मी आपला कोणाला
म्हणू ? आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपल्या
इतका प्रिय, सत्यवादी,
सुहृद आणि महान
दुसरा कोण आहे
? स्वत:ला भक्तांच्या
अधीन करून देखील
तुम्ही परिपूर्ण आहात, केवळ
आपणच भक्तांच्या सर्व
इच्छा तृप्त करू
शकतात आपण खूप
खूप कृपाळू आहात.
आता मी आपणास
पुढे लिहण्या आधी
विनंती करतो कि
आपण मला ह्याचे
उत्तर नक्की द्यावे.
कारण मी काही
करावे आणि आपणास
ते योग्य न
वाटते मग माझे
मला समजत नाही
कि काय करावे.
आता आपण मला
अनुग्रह देणार आहात मी
आपणा करता काय
आणू कि ते
आपणास योग्य असेल
आणि आपण ते
स्वीकार कराल. ( खरे तर
सगळे काही आपले
आहे आणि मी
वेगळे काय देऊ
? ) स्वामीजी हा माझा
हट्ट समजा किवा
काही पण आपण
नक्की मला सांगा
हि कळकळीची विनंती.
आपणास अजून काही
विनंती करू इच्छितो
आपण होकार द्यावा
हि खूप खूप
इच्छा आहे.
१. आपणा सोबत
हृषीकेश, हिमालय, किवा आपल्या
गुरु आश्रमाला आपल्या
सोबत जायची इच्छा
आहे किवा जिथे
आपणास शक्य असेल
तिथे यात्रा करायची
आहे मग आपण
सप्तशृंगी गडावर हो म्हणाल तरी चालेल. कृपया आपण हि
संधी आपण द्यावी
हि खूप खूप
मनापासून इच्चा आहे कृपया
हि इच्छा नक्की
पूर्ण करा.
२. आपल्या लेखनातून आम्ही
खूप काही नवीन
जाणले आणि खूप
काही शिकलो पण
मी आपणास एक
विनंती करू इच्छितो
को आपण " शपथ
" ह्यावर आपण लिहावे
कारण खुपदा काळात
न कळत शपथ
घेतली जाते ( कधी
खरी कधी खोटी
) कारण त्या मागची
गंभीरता किवा त्याने
काय होते हे
माहित नाही. स्वामीजी
ह्या विषयावर कृपया
मार्गदर्शन करा.
३. आपण पसायदानचा
अर्थ सांगावा. आपण
सगळ्यात वेगळे आणि खूपचं
वेगळ्या पद्धतीने आणि खरा
अर्थ सांगतात त्या
मुळे हि पण
विनंती आपण मान्य
करावे हि विनंती.
स्वामीजी मला
आपल्याप्रती माझे विशुद्ध
प्रेम विकसित करायचे
आहे. आपण माझे
स्वामी आहात आणि
मी आपला सेवक.
मला आपल्यातील संबंध
विकसित करायचे आहे. आपण
माझे स्वामी माझे
पिता आहात ह्या
नात्याने हे संबंध अधिकाधिक
विकसित होतील. मला सेवक
म्हणून आपण मान्य
करा. कारण आपणाशी
असलेला आध्यत्मिक संबंध हा
सर्वच बाबतीत दिव्य
आहे. आपला आणि माझा
संबंध पूर्ण दिव्य
आहे आणि आपल्या
प्रेमाच्या बदल्यात मी अनेक
अनेक जन्म जन्मांतरानंतरीही
आपणास काहीच देऊ
शकत नाही. मला
आपल्या योग्य बनवा इतकीच
मी प्रार्थना करतो.
भक्तीकरता
जे सहा मुलभूत
तत्वे सांगितले आहात
त्यावर मी काही
बोलू इच्छितो.
पहिले तत्व सांगितले आहे
कि भक्तीकरता अनुकूल गोष्टीचा स्वीकार
व दृढ निश्चयी
असले पाहिजे - ह्या
बाबतीत मी थोडा
हळुवार प्रगती करतोय. आता
अनुग्रहानंतर प्रगती करेल हे
निश्चित.
दुसरे म्हणजे भक्तीसाठी
प्रतिकूल गोष्टींचा त्याग केला
पाहिजे आणि हे
करण्यासाठी कृतीनिश्चयी असले पाहिजे
- कृती करतोय पण सगळ्या
गोष्टींच सहज त्याग
होत नाही. पण
ह्यात मी थोडा
समाधानी आहे.
तिसरे म्हणजे केवळ
आपणच म्हणजे गुरु
/ कृष्ण आपले रक्षण
करू शकेल हि
खात्री असणे - मी हे
पूर्णपणे जाणतो कि आपण
सर्व शक्तिमान व
दयाळू आहात.
चौथे म्हणजे आपणच
आमचे पालनपोषणकर्ते आहात
हे मी पूर्णपणे
स्वीकारतो.
पाचवे तत्व म्हणजे आपली इच्छा
स्वतंत्र असू नये,
सदैव गुरु / कृष्णाच्या
इच्छे नुसार वागणे
- ह्या बाबतीत मी खूप
खूप कमी पडतोय
माझा माझ्या मनावर
ताबा नाही आता
ह्या मार्गात आलोय
तर आपण माझ्या
मनाचा ताबा घ्यावा
जसे कृष्णानी अर्जुनाचा
रथ स्वत: आपल्या
ताब्यात घेतला.
सहावे तत्व म्हणजे भक्ताने सदैव
स्वतःला अत्यंत पतित मानले
पाहिजे - आता सत्य
परिस्थिती आपण जाणता
कि मी खूप
खूप पतित आहे
आणि मी ह्या
माझ्या पेक्षा कोणी पतित
असू शकत नाही
आणि आपण पतित
पावन आहात मग
आता ह्या पतित
जीवावर कृपा करा
आणि ह्याला आपल्या
सेवेलायक बनवा. मी गोंदवलेकर महाराजांच्या एक पुस्तकात
असे वाचनात आले कि महाराज आपल्या नवीन शिष्याला उत्तर देताना म्हणतात कि तू फक्त नाम
जप कर बाकी मी सांभाळून घेईल कारण जर तुझा बापाने ( महाराजांनी ) आधीच खूप कमवून ठेवले आहे तर तुला जास्त मेहनत करायची
गरज नाही त्या मुळे तू भक्तीमध्ये निश्चिंत हो. तसेच आपण हि आहात सर्व बाबतीत श्रीमंत
म्हणून मी हि आपल्यावर पूर्णपणे अवलंबून आहे.
आपली भक्ती करणे हा
आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे
आणि मी ह्या
मार्गावर चालताना जर आपला
आशीर्वाद असेल तर
लवकर आपली पूर्ण
प्राप्ती होईल. आपल्या चरणकमळांना
गेल्यावर मी हा
भवसागर पार करू
शकतो हे मी
निश्चितपणे जाणतो. मी आपला
नित्य दास आहे
आणि हे जेव्हा
मी विसरलो तेव्हापासून
बद्ध अवस्थेस आणि
मायेवरील आकर्षणास कारणीभूत
ठरलो. आपली भक्ती
म्हणजे सर्व भौतिक
समस्यांचे उत्तर आहे
आपणाशी थोडाच काळ संग
केल्याने आध्यत्मिक जीवनाचे महत्व
कळून येते ह्यापूर्वी
मी कधी साधू
संग केला नव्हता.
आपणास भेटून किवा
आपल्याबद्दल फक्त विचार
करून अंत:करणास
अल्हाद आणि संतुष्टी
मिळते.
स्वामीजी
आपल्या व्यतिरिक्त मी अन्य
कोणत्या व्यक्तीला शरण जाऊ
शकत नाही. आपल्या
इतका प्रिय, सत्यवादी,
सुहृद आणि महान
दुसरे कोण आहे
? स्व:ताला भक्तांच्या
अधीन करूनदेखील आपण
परिपूर्णच आहात , केवळ आपणच
भक्तांच्या सर्व इच्छा
करू शकता आणि
स्व:ताला भक्तांच्या
स्वाधीन करू शकता
हे स्वामीजी ! माझ्या मनाला
नियंत्रित करून कृपया
मला या भौतिक
बंधनातून मुक्त करा.
हे स्वामीजी ! माझ्या मनाला
आपल्याकडे आकर्षित करून घ्या.
हे स्वामीजी ! आपल्या अतुलनीय
मधुरतेद्वारे कृपया
माझे हृदय आकर्षित
करा.
हे स्वामीजी ! मला भक्तीमध्ये
स्थिरता प्रदान कर. जेणेकरून
मी आपल्या नामाचा
जप, गुण, लीला
यांची स्थुती करू
शकेल.
हे स्वामीजी ! आपल्या सेवेप्रती
माझ्या मनात रुची
उत्पन्न होवो.
हे स्वामीजी ! कृपया मला
आपल्या सेवेयोग्य बनवा.
हे स्वामीजी ! कृपया मला
निर्देश द्या कि,
कश्या प्रकारे मी
आपली सेवा करू
शकेन.
हे स्वामीजी ! मला आपल्या
दिव्य नाम, रूप,
गुण आणि लीलांच्या
स्मरणात नियुक्त करा.
हे स्वामीजी ! मला आपल्या
सेवाकृपात स्वीकार करून कृपया
माझा आपणास हवे
तसे वापर करा.
हे स्वामीजी ! कृपया माझ्याद्वारे
प्रसन्न व्हा.
मी माझे लिहणे
इथेच थांबवतो.
आपला (अ) भक्त
निलेश