||
जय गुरुदेव || दि. १९.०१.२०१५
प पु स्वामीजी आपणास दंडवत प्रणाम.
आज पत्रास कारण कि आपणास फक्त धन्यवाद करावे म्हणून तसे धन्यवाद हा शब्द खूप छोटा आहे आणि आपण शब्दात बसणारे नाही. आपली आम्हावर खूप मोठी कृपा झाली एक सामान्य, शुद्र जीवावर गुरूकृपेच वर्षाव करून. धन्य आहे आपले औदार्य जे माझ्या सारख्या एक अभाक्ताला आपण आपलेसे केले. आज खऱ्या अर्थाने करुणासिंधु, दिनानाथ, दिनबंधू , करुणासागर हे सगळे शब्दांचे खरे अर्थ कळाले.
मंत्र दीक्षा घेतल्या पासून खूप आतून प्रसन्न वाटते आणि भगवंताच्या जवळ असल्याचे आज जाणवत आहे. माझ्या करता हा खूप नवीन अनुभव आहे. कारण माझा एक नवीन जन्म झाला आणि पुन्हा आपल्या सोबत असलेले नाते पुन्हा ह्या निमित्ताने प्रस्थापित झाले. ह्या गोष्टीचे विस्मरण झाले होते आणि तेच सगळ्या दुःखाचे कारण होते. मनुष्य जेव्हा भगवंतापासून दूर जाते तेच त्याच्या पतनाचे कारण असते आणि आपण मला ह्या सगळ्यातून वाचवले आणि माझ्या जन्म सफल झाला असे मी आज पूर्ण पणे म्हणू शकतो. एक नवीन प्रवासाला सुरवात झाली आणि आपली कृपा हे सगळे विचार करूनच खूप वेगळा आनंद देऊन जातो.
थोडे आपल्या नवीन पुस्तकाबद्दल

आपले
नवीन पुस्तक वाचले आणि एक नवीन विश्वात गेलो. खरोखर हे सगळे माझ्या करता अनोखे आहे
हे अनुभव नक्की भक्ती मार्गात प्रेरणा देणारे तसेच भक्ती दृढ करणारे आहे. सगळे अनुभव
हे ईश्वरी शक्तीचे दर्शन करवणारे आहे तसेच कोणालाही ईश्वराप्रती प्रेम जागृत करणारे
आहे. मी तर हेच बोलेल कि ज्याची थोडी जरी भक्ती असेल तो नक्की हे अनुभव वाचून नक्की
भक्तीच्या सर्वोच्च पदावर जाईल. मी काय लिहावे समजत नाही फक्त मला एक अभिमान आहे कि
आपण माझे गुरु आहात. मी स्वत:ला खूप धन्य मानतो ह्या बाबतीत तसेच अजून एक बाबतीत
आम्ही सगळे भाग्यवान आहोत कि आपले अनुभव आम्हास ऐकायला मिळतात. ( ह्या करिता मी सरू
ताई आणि प्रतिभा ताईला धन्यवाद देतो कारण त्यांच्या मुळे हे सगळे अनुभव आमच्या जवळ
आले ते एक पुस्तकाच्या रुपात ) आपण खुपदा गीता मधील श्लोकाचे वर्णन करून सांगत
असतात पण हे आपल्या जीवनात कसे घडत गेले हे समजल्याने त्या श्लोकाचा खरे अर्थ कळला.
सगळे अनुभव हे विलक्षण आहे. भगवंत सदैव आपल्या सोबत आहे व तो आपली काळजी करतो हे बघितले. पण स्वत: वरून सांगतो कि खरच त्याला कधी मदतीला आतून हाक दिली नाही आणि कधी त्याला पूर्णपणे शरण गेलो नाही. पण आतून आता भगवान खूप जवळ असल्याचे जाणवते. आपले पुस्तक आपले प्रवचन आणि मार्गदर्शन सगळे काही वेगळेच आहे आणि कायम विचार करायला लावणारे आहे. आम्ही काय पुण्य केले माहित नाही पण आपल्या सारखा एवढा अधिकारी पुरुष म्हणजे साक्षात भगवंत मिळावा हे भाग्य समजतो म्हणून आपण दीननाथ, कृपासिंधु, करुणासागर आहत. आमची श्रद्धा कमी पडते व प्रश्न निर्माण होतात पण आता ह्या अनुभवातून नक्कीच विचारात बदल घडेल आणि आता पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचे स्मरण सुरु असते आतून एक वेगळा विश्वास , श्रद्धा निर्माण झाली आहे.
स्वामीजी आपला प्रवास हा खरच थक्क करणारा आहे. परंतु हे पुस्तक आणि अनुभव आपण खूप थोडेच दिले आहे. आपण अजून लिहावे हि खूप मनापासून इच्छा आहे. हे पुस्तक म्हणजे भगवंताच्या शोधात ( आत्म साक्षात्कार ) निघालेल्या सगळ्यांना प्रेरणारूप बनेल हे नक्कीच.
आपले अनुभव आणि भगवंताची कृपा ऐकून खरच आम्ही तृप्त होते पण हेच स्वतः करता विचार केले तर खूप विचार येतात कि फक्त अंगावरच्या कपड्यात कसे काय आपण राहू शकतात ते हि थंडी, उन्हाळा , भयंकर अश्या पावसाळ्यात ? आम्हाला तर झोपायला नीट अंथरून नसेल तर झोप लागणार नाही हि आजची परिस्तिथी आहे पण आता मनाची तय्यारी करतोय आणि सवय हि लावतोय कि आहे तसे जगायचे जास्त तक्रार नाही करायची. हे पुस्तक आमचे आयुष्य खूप काही बदलणार आहे हे नक्कीच कदाचित उद्याची तय्यारी हि आज करत आहोत.

आपण
ह्यात ओरिसा किवा हिमालयात होते त्यातले अनुभव खुपसे नाही स्वामीजी आमची विनंती म्हणा
किवा आग्रह आपण कृपया ह्याचे पुढे आपले अनुभव आणि जे आपणास प्रचीती आली ते आपण जरूर
लिहावे ते आम्हाला प्रसादरूपी आहे.
आपले प्रवचन किवां पुस्तक वाचले तर मग कोणाचे पुस्तक किवा प्रवचन जास्त ऐकण्याची इच्छा होत नाही आणि मग तिथे सारखे आपले विचार येतात आणि वाटते आपले जे ज्ञान आहे ते किती उच्च प्रतीचे आणि शुद्ध व किती सहज आहे. बाहेर काय आहे हे मी इथे सांगायची गरज नाही.
आपल्या प्रवासात आपण विविध प्रदेश, समाज आणि धर्माचे खूप अभ्यास केला आहे आणि माउलींच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच सोबत दत्त माउली आणि गुरुचे पाठबळ हे सगळे खूप खूप काही सांगून जातात. आपण म्हणजे एक साहसी योगी आहात
पुस्तकाचे जो मुखपृष्ठ ते अतिशय सुंदर आणि खूप अर्थपूर्ण आहे.
हे अनुभव वाचत असताना खालील ओळी आठवल्या
जेथे
जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी
हाती धरुनिया
चालो
वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी
भार सवे माझा
बोलो
जाता बरळ करीसी ते नीट
नेली
लाज, धीट केलो देवा
तुका
म्हणे आता खेळतो कौतूके
जाले
तुझे सुख अंतर्बाही
स्वामीजी हे सगळे वाचून २ प्रश्न पडले समोर विचारण्याची हिम्मत अजून आमच्यात नाही म्हणून इथे विचारतो.
१. ह्या प्रवासात आपण एवढे कमी कपडे घेण्याचे कारण काय होते ? कारण एवढा त्रास आपण सहन केले पण इथे आम्हाला वाचून ते कसे तरी होते तर स्वामीजी आपण ते कसे सहन केले असणार असे ? फक्त ते गिरनार चा पाऊस असो कि पायी प्रवास किवा कुठे झोपण्याचे असो तसेच चप्पल न घालण्याचे कारण हि समजले नाही. ( फक्त असे समजते कि हि धरती माता आहे म्हणून तिच्या वर चप्पल घालून नाही फिरावे असे का ?)
२. पायी प्रवासाचे नेमके काय कारण असते ? थोडे विस्ताराने सांगाल तर समजण्यास मदत होइल.
स्वामीजी आपण सहज कधी आपले अनुभव सांगत असतात ते हि कायमचे मनात कोरले जातात. आताचे सांगायचे तर आपण अष्टविनायकचा अनुभव असो किवा आपण सहज म्हटले कि आपण आधी समर्थ रामदास सोबत होतो असे एक ना अनेक गोष्टी आहेत म्हणून कायम आपला सहवास हवा हवासा वाटतो. मी मागच्या पत्रा म्हध्ये आपणास " विद्यापीठ" म्हणून संबोधले होते ते ह्याच करणा करता. सगळ्या गोष्टीचे आपण किती सहज उत्तर देतात. कसे काय स्वामीजी हे सगळे आम्ही तर फक्त ऐकूनच आश्चर्य करतो आणि आतून खूप सुखावतो.
अजून एक म्हणजे आपण कोणाच्या घरी थांबले असाल तर तिथे काय व कसे घडले हे सांगत असतात तेव्हा आम्हला कळते कि आपण कसे वागायला पाहिजे. तसे ह्या आयुष्यात कधी साधू, संतांचा कधी संग लाभला नाही कसे राहायचे, कसे वागायचे कधी माहित नाही. पण आपण आम्हास लाभले आम्ही आता सगळे शिकत आहोत आणि शिकत राहू. आपण एकदा जरी हलकेसे हसले तरी पूर्ण जग जिंकल्याचा अनुभव येतो.
अजून एक... मला आपल्यामुळे महाराष्ट्रातील साधू संत ह्या बद्दल समजले ( आधी जे समजले होते ते फक्त वर वर होते ) आणि त्या बद्दल अजून ओढ, प्रेम निर्माण झाले विशेष करून ज्ञानेश्वर माउली व गोंदवलेकर महाराज. ह्या दोघात व आपणात एक खूप साम्य म्हणजे कुठलाही विषय सहज आणि सोपा करून सांगणे समजवून गोष्टीत छानशी कथा किवा उदाहरण देणे. आज मी गोंदवलेकर महाराजांची पुस्तक वाचली आणि ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे. मी खरच हे सगळे वाचून खरचे समजलो कि आपण ज्ञानेश्वरी वाचन करायला का सांगत असत आता मी म्हणू शकतो कि आम्ही खरच भाग्यशाली आहोत ते म्हणजे आपण आम्हाला आपले केले व दुसरे म्हणजे संत ज्ञानेश्वरी माउली बद्दल जे सांगितले व गोंदवलेकर महाराजाबद्दल.
आपणामुळेजीवनात हळू हळू खपू काही बदल होत आहेत अगदी सकाळी उठल्या पासून "कराग्रे वसते लक्ष्मि असो कि "गंगेच यमुनेचैव" कि मग जेवताना " वदनी कवळ घेता" असो कि दुर्गा नामावली आणि असे खूप खूप काही आपण आम्हाला नकळत शिकवले आणि आज त्याचे पालन करतोय. आणि विशेष करून भगवंताची भक्ती असो किवा पूजा आपण जे सांगितले ते एवढे सहज आहे असे कधी वाटले नव्हते कारण बाहेर खूप काही सांगण्यात येते आणि आज तेच पुन्हा कोणा कडून ऐकले तर हसू येते कि कसे अर्धवट ज्ञान लोकांना दिले जाते आणि लोक हि कसे ह्यात मध्ये अडकतात. अशी एक नाही अनेक कारणे आहेत कि ज्यामुळे मी स्वत:ला धन्य मानतो कारण आपण आम्हाला " AS IT IS " Accept करणे.
आता मी अगदी थोडक्यात २ ओळी लिहतोय. मी आपणास काही आणले तर आपणास ते योग्य वाटत नाही पण / किवा आवडत नाही. त्या मागची आपली भावना मला माहित आहे पण मी काय करू ? माझे म्हणजे असे झाले आहे कि जसे एक गरीब मुलाचे श्रीमंत मुलीवर प्रेम व्हावे आणि तिच्या एक हास्या करता तो काही करतो तशी स्तिथी माझी झाले आहे मी काय करू सांगा. आपण कृपया काही रागवू नका एवढेच. थोडा आगाऊपना करून आपलेच एक वाक्य इथे लिहतोय त्या करता आधीच क्षमस्व. आपण म्हणतात कि जे काही कर्म / कार्य कराल जसे आपण कपडे घ्याल तर एक कपडा त्या भगवंता करता घेतला तर ते कर्म बधत नाही तसेच माझे हे असे समजून आपण रागवू नये एवढेच. आपण जे काही बोलत असतात ते मी तेव्हडेच आतुरतेने ऐकतो तसेच ज्या काही छोट्या गोष्टी आहेत ते करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात मी खूप खूप छोटा आहे आणि आपण म्हटले त्या प्रमाणे जगन्नाथाचा रथा सारखे आपले आहे. आपण साक्षात भगवंत आहात आणि जर आम्हाला काही करायला मिळतेय तर ती संधी आम्ही का सोडावी ?
इथे मला ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या आठवतात ज्यावर माउलीनी खूपचं सुंदर पद्धतीने सांगितले आहे. नवव्या अध्यायात " पत्र पुष्प फळ तोय यो मी भक्त्या....." " मग निस्सीमभाव उल्हासे । मज अर्पावयाचोनी मिसे । फक्त एक आवडे तैसे । भलतयाचे हो । ।।८२।। भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडावी । मग देठे न फोडिता सेवि । आदेरेशी। ।।८३।।
ते ९७ पर्यंत. ( माझा बोलण्याचा उद्देश आपण समजले असाल त्या मुले मी काही जास्त लिहत नाही )
माझं आजचं जे जीवन आहे, या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारे आपण आहात मी जो पूर्वीचा होतो, तो आता राहिलोच नाही ( खूप बदल आले आहे व येत राहतील ) , हे सगळे आपल्या कृपे मुळे घडत आहे.
गुरूचं काय सामर्थ्य आहे याची मला पूर्ण कल्पनाच नाही. तुकाराम महाराज म्हणाले, "गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टीपुढे" आम्हाला गाढव म्हटलं आहे! हा खरोखर त्यांचाच अधिकार आहे. आमच परमार्थदृष्ट्या गाढवपणच आहे. यासाठी उपाय एकच- तो म्हणजे आपल्या गुरूला कायमचं चिकटणं! आणि त्या करता मी कायम प्रयत्नशील असेल.
आपण म्हणजे दिव्यासारखे तो पेटलेला आहे. तुम्ही तुमची वात त्याच्या जवळ नेली की तो कमी होतच नाही, पण तुमची ज्योत पेटवून देतो; हे मी अनुभवतोय
आपण
गुरु रुपात भेटले ह्याचे मला तर खूप आनंद आहेच पण आज मला सारखे वाटते कि मी किती भाग्यवान
कि मला गुरु आश्रम राहायला मिळते, सेवा करायला मिळते, आपला सहवास लाभतो ( बाहेर जी
जत्रा भरली आहे त्या पासून वाचलो ( आपण वाचवले ) ) आपल्या सारखे आपणच आहात. आपले सगळे
बोलणे हे सहज असते. आपल्या बोलण्यात ना धर्म ना पंथ ना कुठल्या रूढी ना परंपरा. आपले
बोलणे म्हणजे सर्वाकष असते ( बाकी सगळीकडे अगदी चाकोरीबद्ध बोलणे वागणे असते )
ज्ञानेश्वरीचे वाचन सुरु आहे ते वाचत असताना सारखे असेच वाटते कि आपणच ते आपणच सांगत आहत. ज्ञानेश्वरी खूप खूप सहज व सोपी आणि खूप खूप रसाळ आहे. आज आपल्यामुळे मी ती वाचायला घेतली आपण आम्हावर कायम उपकार करत असतात. जसे आपण मला आपलेसे करून उपकार केले तसे ज्ञानेश्वरी बद्दल आपण सांगून खूप उपकार केले. अजून मी काय सांगणार....
स्वामीजी पुन्हा एकदा आपले मी धन्यवाद करतो कारण आपण मला एक विचित्र घटने मधून बाहेर काढले. मी ह्या महिन्याच्या सुरवातीला असेच एका भावनिक प्रसंगात होतो आणि मला काही मार्ग दिसत नव्हते २-३ दिवस खूप रडलो पण मार्ग दिसत नव्हता शेवटी एकांतात जाऊन आपणास मी आतून आपणास खूप विनंती केली आणि मग नंतर जप केला आणि काय आश्चर्य मी ह्या सगळ्यातून असा बाहेर आलो कि जसे काही झालेच नव्हते. इथे मी सविस्तर काही लिहत नाही. आज आपणस माझ्या सोबत नसते तर मी कुठल्या स्थितीत गेलो असते हे सांगणे खूप खूप अवघड आहे.पण इथे पुन्हा एक गोष्ट आवर्जून आठवली ती म्हणजे आपण मागच्या वेळेस सांगितले होते कि जास्त emotionally राहायचे आणि आणि आपण आपल्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी हि सांगितल्या होत्या त्या आठवल्या पण आता हे सगळे कायमचे लक्षात राहील. स्वामीजी आज आपण माझ्या सोबत नसते तर मी आता वेगळ्या विचारात असतो पण गुरु कसा पाठीराखा असतो हे पुन्हा मी आज अनुभवले.

माझ्या २-३ इच्छा आहेत त्याला आपण फक्त होकार द्यावा कारण मी काही करावे आणि आपण नंतर रागवावे म्हणून इथेच विचारतो. मला खात्री आहे कि आपण ह्या करता होकार नक्की द्याल.
१. नवरात्री / गुरु पौर्णिमा मध्ये मला "माँ" ला खूप साऱ्या फुलांचा ( पाकळ्यांनी ) अभिषेक करायचा आहे ( व सुगंधी द्रव्य व दुध,दही,मध असे अनेक प्रकारे करायचा आहे ) तसेच आश्रमत १०८ दिवे लावायचे आहे ( ९ दिवस ) तसेच एक अखंड दिवा ( समई ) लावायची आहे.
2. आश्रमात मोठी रांगोळी आणि लायटिंग
3. आपण खूप सारे लेखन करत राहावे हि अजून एक इच्छा कारण आपण खूप काही लिखाण करून ठेवले आहे ते मी बघितले आणि खूप गोष्टी आहेत ज्या आपण बोलतात पण ते सगळे पुस्तक रुपात आले तर सगळ्यांना फायदा होईल. पुस्तकच एक असे मध्यम आहे ज्याने आपण सगळ्यांच्या घरात पोहचले आहात आणि ते वाचून आपण सगळ्यांच्या हृदयात.
शेवटी एक विनंती करू इच्छितो.. आपण मला एक वस्तुरूप असे काही द्यावे कि जे मी सदैव माझ्या सोबत ठेवू शकेल किवा देव घरात ठेवू शकेल.
स्वामीजी मी कायम आपणाकडे मागत असतो पण काय करू ? आता मी आश्रमात आलो कि मला आपले चरण सेवा द्या मी खूप छान सेवा करतो तुम्हाला हि खूप आनंद मिळेल हे नक्की. मी आधी हि आपणास विनंती केली पण आपण नाही सांगितले पण मी ह्या वेळेस ती सेवा घेईल हे नक्की.
मी सोबत "तुषार्त पथिक" पुस्तक पाठवत आहे स्वीकार करावा. ज्ञानेश्वरी मी येतांना घेऊ येईल किवा कोणी येणार असेल तर पाठवतो ( साखरे महाराजंची )
आपला भक्त
निलेश