Saturday, May 2, 2015

Sorry and Thank you



                                                      दिनांक २८. ०४. २०१५
पू  स्वामीजी 

दंडवत प्रणाम 

आज पत्र  लिहण्याचे काही वेगळेच कारण आहे खरे तर हे पत्र नाही विनंती / माफी पत्र  आहे

आश्रामाहून आल्या नंतर आपणास पत्र लिहणार होतो परंतु आपण खूप रागावले होता म्हणून माझी विचार करण्याची शक्तीच संपली होती.माझी आधीच काही हिम्मत होत नाही आपल्या समोर बोलण्याची आणि त्यात आपले हे रूप बघून मी पूर्णपणे  घाबरलो आणि काही सुचेनासे झाले हे रूप म्हणजे नरसिंह भगवंताचे रूप समोर आले पण स्वामीजी मी भक्त प्रल्हाद नाही कि आपणास शांत करू शकेल. आपण मला माफ करावे हीच आपल्या चरणी प्रार्थना  मी फक्त वाट बघत होतो आपण घरी येण्याची. स्वामीजी आपणास विनंती करू इच्छितो कि आपण काही झाले तरी मला दूर करण्याचा विचार नका करू . मी माझ्या चुका नक्की सुधारेल आणि आपल्या आज्ञे प्रमाणे वागेल आणि मला हि माझी प्रगती करायची आहे. मी आपणास फक्त विनंती करू शकतो आणि आपण ती स्वीकारावी हि इच्छा . आपण सांगितल्या प्रमाणे मी जाणतो कि गुरूंचे रागवणे शिष्याच्या हिताचे असते पण आपण हे पण सांगितले आहे कि गुरु शिष्य नाते म्हणजे प्रेमाचे नाते असते. आता मी फक्त विनंती करतो कि आपण मला सांभाळून घ्यावे. ( मी दिनहीन साधना-विहीन भक्ती मेरी स्वीकार करो ) ( मी आज पर्यंत कधी कोणाला घाबरलो नसेल तेव्हा घाबरतो आणि तेव्डेच प्रेम हि आहे आणि तेवढा आदर हि आहे )

स्वामीजी आपण घरी आलात आपल्या सानिध्यात खूपच भारावून गेलो साक्षात कृष्ण घरी आले हे मी फक्त विचार केले तरी आनंदी होतो पण ह्या सगळ्यात मी आपली आरती सुद्धा करू शकलो नाही ह्या करता माझ्या सारख मूर्ख अजून कोणी नसेल हा विचार करून खूप त्रास होतो पण मी आपणास विनंती करू इच्छितो कि आपण एकदम पुन्हा घरी यावे म्हणजे अजून चांगल्या प्रकारे सेवा करू शकु. आपण भक्ताची विनंती मान्य कराल हे मी जाणतो मला संधी द्याल हे नक्की ( आपण कृष्ण रुप आहात ह्या वेळेस आपण मला राम वचन द्यावे कि आपण घरी याल असे ). 'साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा' ह्या ओळीच्या प्रत्यय  मला आला. साक्षात भगवान आपल्या घरी येणे ह्या पेक्षा मोठे भाग्य काय असेल ?. स्वामीजी आपण खूपच साधे सहज आहात म्हणजे अगदी घरातल्या मोठ्या व्यक्ती प्रमाणे आपण सहज मिसळून जातात. कुठे मोठेपणा नाही ना कसले वेगळेपण नाही आणि आयुषी सोबत हि आपण सहज बोलणे. स्वामीजी आपण खरच सगळ्या बाबतीत महान आहे मी काय लिहावे समजत नाहीम्हणजे आपण इतक्या उच्च पदाला  आहात तरी अगदी  सर्वसामान्या सारखे राहतात.

स्वामीजी आश्रमात असतांना खूप छान वाटते हे काही नवीन सांगायला नको परंतु ह्या वेळेस मला आपण आपले चरण तीर्थ दिले आणि ते हि वेळेस ह्या पेक्षा आनंदाचा  क्षण काय असणार. आता आयुष्य कुठे तरी योग्य मार्गाने चाललेय अशी जाणीव होतेय हे सगळे फक्त आणि फक्त आपल्या मुळे आता फक्त हि सुरवात आहे आणि आपले  पाठबळ , आशीर्वाद सोबत आहे तर अशक्य हि शक्य होईल ह्यात काही शंकाच नाही.  स्वामीजी आपणा सारखे फक्त आपणच आहत. घरात किवा कुठे कसला हि विषय निघाला कि त्यात आपला उल्लेख होणार नाही असा एक हि क्षण नाही किवा एकही गोष्ट नाही आणि आपले स्मरण होत नाही अशी एक हि वेळ नाही

स्वामीजी आपण जेव्हा समोर असतात तेव्हा मी खूप  जास्त उत्साही असतो आणि त्या उत्साहाला किवा आनंदाला काही पारावर नसतो. आपण सोबत असताना एक वेगळ्या विश्वास असतो आणि खूप आनंदी असतो आणि आपले प्रत्येक शब्द  ऐकण्याला खूप आतुर असतो. आपली वाणी खूप मधुर आहे खूप रसाळ आणि खूप गोड आहे. थोडक्यात म्हणजे अमृतवाणी   (मी कधी अमृत प्रश्न केले नाही पण तरी आपले सगळे शब्द हे अमृताहून काही वेगळे नाही हे मीच काय सगळे भक्त सांगत असतात ) मला तर असे वाटते कि फक्त आपणास  बघत राहावे आणि ऐकत राहावे. आपण सोबत असले कि माझे हृदाचे ठोके कायम वाढलेले असतात आणि आतून खूप खूप प्रसन्न  छान  वाटते  इथे एक गोष्ट सांगू इच्छितो कि आपण स्वभावाने खूपच कडक आहात त्या मुळे  खूप घाबरून असतो पण जेव्हा आपण छान  मूड मध्ये असतात तेव्हा सगळे वातावरण बदलून जाते. ( मी उत्साहाच्या भरात  चुकतो आणि आपणास त्रास होतो मी  आता पूर्ण काळजी घेईल आणि जरी चुकलो तरी मला माफ करा स्वामीजी ) आश्रमात जर सगळ्यात आनंदाचा क्षण आणि निवांत क्षण असेल तर तो रात्रीचा कारण आपण खूप छान मूड मध्ये असतात आणि खूप निवांत ह्या कशाची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो ( जसे चकोर पक्ष्याने अमृत प्राशन करावे तसे मी करत असतो ). फक्त मला अजून आपली पाय दाबण्याची सेवा मिळत नाही म्हणून थोडे वाईट वाटते.

स्वामीजी आपण जेव्हा कोल्हापूरचे स्वामी समर्थांचे अनुभव सांगत होते तेव्हा खूपचं छान तर वाटत होते पण मनात एकाच विचार येत होता तो म्हणजे जर आपल्या स्पर्शाने मूर्ती मध्ये प्राण येतात जसे श्रीरामाने अहिल्येचा उद्धार केला तसा माझा हि उद्धार लवकर आपण कराल कारण मी हि दगडा पेक्षा काही वेगळा नाही आपण साक्षात राम आहात ( मी आपणास श्रीकृष्ण रुपात बघतो ). स्वामीजी माझी खूप इच्छा होती कि आपण देवघरातील मूर्तीला स्पर्श करावा पण काही केले तरी हिम्मत होत नाही साध्या गोष्टी बोलायची म्हणून फक्त आपल्या जवळ येउन बसतो. माझ्यात कधी हिम्मत येईल हे माहित नाही जेव्हा मी आपल्या सोबत मुक्तपणे  बोलू शकू. मला खूप प्रश्न विचारायचे असतात कसे करू आपणच सांगा. मी आता कोणाला प्रश्न विचारात नाही कारण कुठे समाधानकारक उत्तर मिळत नाही आणि आपल्या सारखी समाधानकारक  उत्तर कोणी देऊ हि शकत नाही हे सत्य आहे. स्वामीजी आपण किती सहज आणि लगेच प्रश्नांची उत्तर देतात आणि खरच मनात विचार येतो कि हे किती साधे आणि सरळ उत्तर दिले. आपल्या बघण्यात आणि आमच्या बघण्यात खूप खूप अंतर आहे म्हणून काही कळात नाही ह्या बद्दल हि आपण सांग कि बघण्याची दृष्टी कशी असावी. आपण खूपच हजर जवाबी आहत

स्वामीजी मी काही इच्छा  आपणास सांगू इच्छितो माहित नाही मी लायक आहे कि नाही पण मी ती इच्छा करणे चुकीचे नाहे आणि आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कारण हे मी जाणतो कारण मी आपणस कृष्ण रुपात बघतो मला ते कृष्णाचे बाल रूप बघण्याची खूपच इच्छा आहे. (मला कृष्णाचे ते आकर्षक आणि मोहक बाल रूप खूप खूप आवडते  )  ह्या करता खुपदा  रडू येते कि कृष्ण मला दर्शन का देत नाही मां  आपल्या मुलाला का दर्शन देत नाही ? ती तर आई आहे ना  मग मुलापासून दूर कसे राहू शकते ? मी कसा जरी असलो तरी शेवटी तिचाच मुलगा आहे ना मी असे खूप प्रश्न  कृष्ण  आणि जगदंबेला करत असतो. स्वामीजी आपण तर सर्व काही आहात मग आपण हे सहज घडवून आणू शकता स्वामीजी खरच मला ह्या रुपात दर्शन द्या खूप डोळे भरून दर्शन करण्यची इच्छा  आहे. आपण खूप भक्तांची इच्छा  पूर्ण केली आहे त्यांनी दर्शन घेतले आहे फक्त मी कधी अनुभूती घेतली नाही मी साधनेमध्ये खूप मागे आहे हे नक्की पण तरी माझी जीवनातली सर्वोच्च इच्छा  पूर्ण करावी हि विनंती. तसेच आपण प्रेमाचे सागर आहात ह्या प्रेमाच्या सागरात मला थोडे तरी डुबू द्या मला हि ह्या दिव्य शक्तीचा  अनुभव घेऊद्या ( एक गाणे आठवले म्हणून ओळी लिहतोय " तू प्यार का सागर है, तेरी एक बूँद के प्यासे हम")  स्वामीजी आपला खूप मोठा अधिकार आहे सगळ्या बाबतीत अगदी ते मी कविते मधून आणि आपल्या बोलण्यातून जाणवतो अगदी आता आपणस महाबळेश्वर ला सोबत येण्याकरिता संदीप  सोनार ह्यांनी सांगितले तर आपण सहज उत्तर दिले कि शंकराला वाटत असेल तर तो बोलवेल किती अधिकाराने आपण बोलतात हे जेव्हा ऐकतो आतून कंध खूप दाटून येतो

आपल्या बद्दल किती काय लिहावे समजत नाही पण अजून एक गोष्टी अगदी सहज उल्लेख करावीशी वाटते ती म्हणजे आपल्यातला उत्साह अगदी तरुणालाही  लाजवेल असे. खरच आपल्याबद्दल किती हि लिहा सगळे कमीच वाटते. स्वामीजी आपण पुन्हा एकदा धन्यवाद आपण मला आपलेसे केले त्या बद्दल. ह्या नवीन परिवारात स्थान दिले आणि मला सरू ताई  स्वाती ताई  ( स्वाती बापट ) दोघांचा खूपच छान  स्वभाव आहे आणि काही झाले तरी मी फक्त ह्या दोघांना  विचारत असतो आणि दोघेही खूप खूप समजून घेतात आणि दोघे अगदी भक्ती मध्ये उच्च पदाला पोहचले आहे आणि आश्रमात तर सगळे आपलेच झाले आहे.
स्वामीजी मी आपणास आशीर्वाद  मागितला होता कि माल ज्ञान ,बुद्धी आणि  वैराग्य  द्या ह्यातला एक आशीर्वाद ( सद्बुद्धि ) आपण मला माझ्या वाढदिवसाला  दिला आता हे पण आशीर्वाद द्यावा म्हणजे साधनेत लवकर मी पुढे जाईल

स्वामीजी आपण खुपदा बोलतात कि मज पामरासी काय थोरपण ।पायींची वहाण पायीं बरी ।। हे ऐकून चांगले नाही वाटत आपण तर सर्वश्रेष्ठ  आहात ह्या तिळमात्र  शंका नाही मग आपण का असे बोलतात ?
एक माझी अजून आहे ती म्हणजे आपला वाढदिवस  साजरा करायचा आहे आपण कृपया रागवू नका स्वामीजी माझी खूप इच्छा आपण फक्त हो म्हणा बाकी सगळे मी करेल  (हेच क्षण असतात जिथे आम्ही थोडे काही वेगळे करू इच्छितो    )

स्वामीजी आता मी जास्त लिहत नाही पण एक सहज विचारतो कि आपले ज्ञानेश्वर माउली , गोंदवलेकर महाराज आणि रामकृष्ण परमहंस ह्या वर खूपच प्रेम आहे अर्थात सगळे श्रेष्ठ आहेत ह्यात काही शंका नाही जसे आपले गुरु महाराज तसे आपण ( आपणही परमहंस पदाला पोहचले आहात ) ह्या प्रेमाचे काही विशेष कारण ? अर्थात आपण लहानपणापासून ज्ञानेश्वरी  वाचत आहात म्हणून हे एक कारण असेल तरी आपण कधी वेळ असल्यास कृपया सांगावे हि नम्र विनंती. ह्या विशेष प्रेम बघून  मी आपणा करिता फोटो प्रिंट करून आणले होते पण आपण ते दुसऱ्यास  दिले ( अर्थात ते कोणाला द्याचे किवा ठेवायचे तो आपला हक्क )
स्वामीजी खालील वाक्य गोंदवलेकर महाराजंची आहे आणि शेवटी महाराज आणि आपण काही वेगळे नाही हि खालची वाक्य मी मनात कोरून ठेवली आहे. मागच्या पत्रात हि मी हा उल्लेख केला होता कारण वाक्य खूप सहारा देतात

मी तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही माझे झाला आहात.
तुम्हाला कसली काळजी करण्याचे कारण नाही.
तुम्ही श्रीमंत बापाची मुले आहात;
तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही.

स्वामीजी एक प्रश्न आपण आमच्या कल्याणाकरता सतत एवढे झटता. आम्हाला त्याची जाणीव नसते. आम्ही ती ठेवताच वागतो. तरी आपला आमच्याबद्दलचा आपलेपणा कसा कमी होत नाही?
स्वामीजी आपण म्हणजे सर्व कारणांचे  कारण आहात
स्वामीजी आपण सगळ्यासमोर अक्षरशः हिमालायापेक्षा मोठे काम करून ठेवले आहेत. असे म्हणतात, की भगवंत समजावा यासाठी सद्गुरूंची गरज असते. पण आमच्यासारख्या परमार्थात शून्य माहिती असणाऱ्यांसाठी सद्गुरू काय सांगताहेत हे आपण दाखवून दिले. आपण अजून खूप लिखाण करावे आपले खूप सारे लिखाण करून ठेवले आहे ते प्रसिद्ध करावे म्हणजे हा अमुल्य ठेवा आपण पुढच्या  पिढीला मिळेल
आपल्या करिता खरोखर शब्द तोकडे आहेत
स्वामीजी आपल्याबद्दल काही लिहावे हे म्हणजे समुद्राला कमंडलूत पकडण्यासारखे आहे. हो, आपण म्हणजे ज्ञानाचा समुद्र...साधनेचा समुद्र...सदाचरणाचा समुद्र
स्वामीजी अजून एक. आपण एका व्यक्तीला पुस्तकावर ज्या दोन ओळी  लिहल्या त्या किती कमी शब्दात सगळे काही सांगून गेल्या " इच्छा आहे आणि श्वास नाही तो मृत्यू   इच्छा  नाही श्वास बाकी आहे तो मोक्ष
आपणास कोटी कोटी प्रणाम…. 
माझा भाव तुझे चरणी
तुझे रूप माझे नयनी ॥१॥
सापडलो एकामेका
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥ 
त्वा मोडिली माझी माया
मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥
त्वा मज मोकलिले विदेही
मी तुज घातले हृदयी ॥४॥
नामा म्हणे गा सुजाणा
सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥
_____
मी तों दीनाहूनि दीन माझा तूज अभिमान
मी तों आलों शरणागत माझें करावें स्वहित
दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा
तुका ह्मणे आतां भलें नव्हे मोकलितां

स्वामीजी मी खाली रामदास स्वामींची करुणाष्टके  देत आहे फक्त समोर आपण आहात  ( रामरायाच्या रुपात आणि मी आपणास प्रार्थना करतोय )
हि करुणाष्टके खूप छान  आहे म्हणून.
अनुदिन अनुतापें तापलों रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझें नावरे आवरीता
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला
रघुपति मति माझी आपुलीशी करावी
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें
प्रचलित करावी सर्वथा बुद्धि माझी
अचल भजनलीला लागली आस तूझी

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा
म्हणवुनि करूणा हे बोलतो  दीनवाचा

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं
अवचट मज भेटी होत घालीन मीठी

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे
पय लगत मूखीं हाणिता वत्स नेणे
जळधरकण आशा लागली चातकासी
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं १०

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे
रघुपतिविण आतां चित्त कोठें राहे
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती
विषय सकळ  नेती मागुता जन्म देती ११

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं १२

सुख सुख म्हणतां हें दु: ठाकूनि आलें
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना
परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना १३

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं
घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें १४

जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी
भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी
सकळभुवनवासी भेट दे रामदासीं १५

असंख्यात ते भक्त होऊनि गेले
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों १६

बहू दास ते तापसी तीर्थवासी
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी
स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं १७

सदा प्रेमराशी तयां भेटलासी
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों १८       

तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले
बहू धारणा थोर चकीत जालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों १९

बहुसाल देवालयें हाटकाचीं
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं
पुजा देखितां जाड जीवीं गळालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों २०

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं
पुढे जाहले संगतीचे विभागी
देहेदु: होतांचि वेगीं पळालों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों २१

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती
किती धर्मसंस्थापना अन्नशांती
पस्तावलों कावलों तप्त जालॊं
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों २२

सदा सर्वदा राम सोडूनि कामीं
समर्था तुझे दास आम्ही निकामी
बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों २३

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं
असा दीन अज्ञान मी दास तूझा
समर्था जनीं घेतला भार माझा २४

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी
अती आदरें सर्व सेवा करावी
सदा प्रीती लागो तुझे गूण गातां
रघूनायका मागणें हेंचि आतां २५

सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणीं देह माझा पडावा
उपेक्षूं नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणें हेंचि आतां २६

नको द्रव्य- दारा नको येरझारा
नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा
सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा
रघूनायका मागणें हेंचि आतां २७

मनीं कामना कल्पना ते नसावी
कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं
नको संशयो तोडिं संसारव्यथा
रघूनायका मागणें हेंचि आतां २८

समर्थापुढें काय मागों कळेना
दुराशा मनीं बैसली हे ढळेना
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता
रघूनायका मागणें हेंचि आतां २९

ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें
म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे
सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां
रघूनायका मागणें हेंचि आतां ३०

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं
स्वहीत माझें होतां दिसेना
तुजवीण रामा मज कंठवेना ३१

विषया जनानें मज लाजवीलें
प्रपंचसंगे आयुष्य गेलें
समयीं बहू क्रोध शांती घडेना
तुजवीण रामा मज कंठवेना ३२

संसारसंगे बहु पीडलों रे
कारुण्यसिंधू मज सोडवीं रे
कृपाकटाक्षें सांभाळि दीना
तुजवीण रामा मज कंठवेना ३३

आम्हां अनाथांसि तूं एक दाता
संसारचिंता चुकवीं समर्था
दासा मनीं आठव वीसरेना
तुजवीण रामा मज कंठवेना ३४


मी प्रेमाच्या भरात  काही जास्त किवा चुकीचे लिहले असल्यास माफ करावे हि विनंती

आपला भक्त 
निलेश बाविस्कर